MP ByElection: भाजप-काँग्रेससमोर उभ्या अनेक अडचणी; इच्छुकांना डावलल्यामुळे नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 05:35 AM2021-10-09T05:35:44+5:302021-10-09T05:36:10+5:30

शुक्रवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. सतनात भाजपचे माजी मंत्री आणि दिवंगत आमदार जुगल किशोर बागरी यांच्या मुलाने अर्ज दाखल केला.

MP ByElection: BJP-Congress face many difficulties; Dissatisfied with the aspirants | MP ByElection: भाजप-काँग्रेससमोर उभ्या अनेक अडचणी; इच्छुकांना डावलल्यामुळे नाराजी

MP ByElection: भाजप-काँग्रेससमोर उभ्या अनेक अडचणी; इच्छुकांना डावलल्यामुळे नाराजी

googlenewsNext

अभिलाष खांडेकर

भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये पुढील महिन्यात चार मतदारसंघात होत असलेली पोटनिवडणूक काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपमध्ये नेते व कार्यकर्त्यांतील नाराजी अनेक अडचणी निर्माण करीत आहे.

शुक्रवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. सतनात भाजपचे माजी मंत्री आणि दिवंगत आमदार जुगल किशोर बागरी यांच्या मुलाने अर्ज दाखल केला. बागरी हे रायगावचे आमदार होते व त्यांचे यावर्षीच्या प्रारंभी निधन झाले. त्यांचा मुलगा भाजपची उमेदवारी मिळेल, अशी इच्छा बाळगून होता. परंतु, पक्षाने प्रतिमा बागरी यांना उमेदवारी दिली. दिवंगत बागरी यांच्या प्रतिमा बागरी या निकटवर्ती नव्हत्या. यामुळे सतना भागात असंतोषाला खतपाणी मिळाले. अलिराजपूर या आदिवासी पट्ट्यात अशाच असंतोषाला काँग्रेस तोंड देत आहे. तेथे दिवंगत काँग्रेस आमदार कलावती भुरिया यांच्या पुतण्याने जाबोट मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्याचे समजते.कलावती भुरिया यांचे कोविड-१९ मुळे निधन झाले. 

Web Title: MP ByElection: BJP-Congress face many difficulties; Dissatisfied with the aspirants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.