शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाचा तपास आता रामभरोसे; घोषणा करूनही SIT ची स्थापनाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 03:41 IST

गृहमंत्र्यांनी एसआयटीची घोषणा केल्याने गुन्हा नोंदवल्यानंतरचा पुढील तपास करावा की नाही याबाबत पोलिसांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. एसआयटी स्थापना होईल म्हणून स्थानिक पोलिसांनी तपास थांबवला अशी माहिती समजते आहे.

मनीषा म्हात्रे मुंबई : दादरा-दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास आता रामभरोसे असल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे. डेलकर आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत केली होती. मात्र शासनाने एसआयटीची स्थापन न केल्याने तपास ना इथे ना तिथे अशा स्थितीत लटकला आहे.

मरीन ड्राइव्ह येथील सी ग्रीन साऊथ हॉटेलच्या खोलीत २२ फेब्रुवारीला डेलकर यांनी गळफास घेत आयुष्य संपविले. मृत्यूपूर्वी त्यांनी दादरा नगरचे प्रशासक प्रफुल्ल पटेल, जिल्हाधिकारी संदीप सिंग, तत्कालीन पोलीस अधीक्षक शरद दराडे, उपजिल्हाधिकारी अपूर्व शर्मा यांच्यासह नऊ जणांची नावे, या व्यक्तींकडून सातत्याने होणाऱ्या मानसिक छळाचा लेखाजोखा मांडणारी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. पोलीस तपास सुरू होत नाही तोच यावरून राजकारण सुरू झाले. याचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात उमटले. डेलकर यांचा मुलगा अभिनव यांच्या फिर्यादीवरून संबंधितांविरुद्ध १० मार्च रोजी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यावेळी अभिनव यांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध काही पुरावेही पोलिसांकडे सादर केली होती. पोलीस पुढील तपास करणार तोच अधिवेशनात देशमुख यांनी या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी एसआयटी नियुक्तीची घोषणा केली.

गृहमंत्र्यांनी एसआयटीची घोषणा केल्याने गुन्हा नोंदवल्यानंतरचा पुढील तपास करावा की नाही याबाबत पोलिसांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. एसआयटी स्थापना होईल म्हणून स्थानिक पोलिसांनी तपास थांबवला अशी माहिती समजते आहे. अशातच डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणात विधी सल्लागाराने मुंबईत गुन्हा दाखल होऊ शकत नसल्याचे सांगितले होते. मात्र गृहमंत्र्यांनी दबाव टाकून हा गुन्हा दाखल करायला भाग पाडल्याचा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

एसआयटी स्थापनेबाबत...एसआयटी स्थापनेबाबत अतिरिक्त गृहसचिव मनुकुमार श्रीवास्तव आणि उपसचिव यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. तसेच पोलीस उपायुक्त शशीकुमार मीना आणि तपास अधिकारी एसीपी पांडुरंग शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांच्याकडूनही याबाबत काहीही प्रतिसाद मिळालेला नाही.

‘साक्षीदारांवर आरोपी दबाव आणू शकतात’डेलकर यांचा मुलगा अभिनवने दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्र्यांनी एसआयटीची घोषणा केल्याचे समजले. मात्र अद्याप मुंबई पोलीस किंवा महाराष्ट्र शासनाने एसआयटीबाबत काहीच कळवले नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, तपास लांबल्याने या प्रकरणातील साक्षीदारांवर आरोपी दबाव आणू शकतात, अशी भीतीही डेलकर कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखPoliceपोलिस