शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मोदी यांनी प्रतिज्ञापत्रांत दिली उलटसुलट माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 05:52 IST

निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेविषयी सतत प्रश्न उपस्थित केले जात असतानाच पंतप्रधान मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, यासाठी आता काँग्रेस दबाव आणू लागला आहे.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेविषयी सतत प्रश्न उपस्थित केले जात असतानाच पंतप्रधान मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, यासाठी आता काँग्रेस दबाव आणू लागला आहे.मोदी व शहा यांच्या भाषणांविषयी काँग्रेसने आधीच आयोगाकडे तक्रार केली आहे. यांच्यावर कारवाई होत नसल्याबद्दल अन्य विरोधी पक्षांनीही नाराजी व्यक्त केली आहे. बसपच्या नेत्या मायावती यांनी तर या दोघांवर कारवाई का होत नाही, असा थेट सवालच केला आहे.त्यातच मोदी यांच्या संपत्ती व मालमत्तेविषयी काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला. सुप्रीम कोर्टात दाखल साकेत गोखले यांच्या जनहित याचिकेच्या आधारे काँग्रेसने मोदी यांनी प्रतिज्ञापत्रात अर्धवट माहिती दिल्याची तक्रार केली. या आधी काँग्रेसने स्मृती इराणी यांच्या गेल्या व या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रांतील माहिती परस्परविरोधी असल्याची तक्रार करीत त्यांचा अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे.नरेंद्र मोदी यांनी २00७च्या प्रतिज्ञापत्रात गांधीनगरच्या सेक्टर १ मध्ये ४११ क्रमांकाचा भूखंड आपल्याकडे आहे व त्याचे क्षेत्रफळ ३२६.२२ चौरस मीटर असल्याचे म्हटले होते. त्यावरील बांधकामाची किंमत ३0 हजार ३६३ रुपये दाखविली होती, पण २0१२च्या निवडणुकीत याचा उल्लेखच प्रतिज्ञापत्रातून गायब झाला. तो विकला का, याचाही उल्लेख त्यात केला नाही. त्याऐवजी ४0१ ए या भूखंडाचा एक चतुर्थांश हिस्सा आपल्याकडे असल्याचे मोदी यांनी नमूद केले.त्यामुळे आधी दाखविलेला ४११ क्रमांकाचा भूखंड कुठे गेला व त्याऐवजी ४0१ ए भूखंड कसा आला, असा प्रश्न काँग्रेसने विचारला. गेल्या, २0१४च्या लोकसभा निवडणुकीतही मोदी यांनी ४११ क्रमांकाच्या भूखंडाचा उल्लेख केला नव्हता, तसेच ३१ मार्च, २0१८ रोजी मोदी यांनी मालमत्तेची जी माहिती वेबसाइटवर टाकली, त्यातही भूखंड क्रमांक ४0१ ए चा एक चतुर्थांश हिस्सा आपल्याकडे असल्याचे नमूद केले आहे. जमिनीचे रेकॉर्ड तपासले असता, त्यात ४0१ ए क्रमांकाच्या भूखंडाचा उल्लेखच नसल्याचे आढळल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. तिथे ४११ क्रमांकाच्या भूखंडाचा उल्लेखच आहे, तसेच ४0१ क्रमांकाचा भूखंड अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या नावे असून, त्यांनीही ४0१ क्रमांकाच्या भूखंडावर एकचतुर्थांश मालकी हक्क असल्याचे म्हटले आहे. या भूखंडावर जेटली व मोदी यांचा प्रत्येकी एक चतुर्थांश मालकी हक्क असेल, तर मग दोन्ही भूखंडांचे क्षेत्रफळ सारखे कसे काय, असा काँग्रेसचा सवाल आहे.त्यामुळे आयोगाने कारवाई करून या भूखंडाच्या मालकी हक्काचा गोंधळ उघड करावा आणि नरेंद्र मोदी यांनी कोणत्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली आहे, हे सांगावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.>प्रसंगी कोर्टात जाण्याचा इशारापंतप्रधान मोदी यांच्याविरुद्ध एकापाठोपाठ एक पुरावे समोर आणून त्यांच्यावर कारवाईसाठी काँग्रेस आता निवडणूक आयोगावर दबाव आणण्याच्या तयारीत आहे. निवडणूक आयोगाने या पुराव्यांच्या आधारे कारवाई न केल्यास प्रसंगी आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावू, असे काँग्रेसने म्हटले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेस