शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अंतिम टप्प्यात; महाराष्ट्रातील ‘या’ मोठ्या नेत्याला मिळणार मंत्रिपद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 10:42 IST

Cabinet expansion: सूत्रांच्या माहितीनुसार, चांगले प्रदर्शन न करणाऱ्या मंत्र्यांची गच्छंती होण्याची शक्यता आहे. तर अनेक नवीन चेहरे मंत्रिमंडळ विस्तारात पाहायला मिळू शकतात.

ठळक मुद्देसध्या मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये २१ मंत्री आहेत. त्यासोबत ९ स्वतंत्र प्रभार आणि २३ राज्यमंत्री आहेत. २०२२ मध्ये उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडसह अन्य राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. सध्याच्या स्थितीत असे अनेक मंत्री आहेत ज्यांच्याकडे एकाहून अधिक विभागाची जबाबदारी आहे.

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र मोदी सरकारच्या कॅबिनेटचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पुढील १-२ दिवसांत ही यादी अंतिम करण्यात येणार आहे. २ वर्षानंतर मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये होणारा विस्तार मोठा मानला जात आहे. मंत्रिमंडळ विस्ताराकडे २०२४ च्या लोकसभा निवडणुका आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पाहिलं जात आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील हा दुसरा विस्तार असेल.

सूत्रांच्या माहितीनुसार, चांगले प्रदर्शन न करणाऱ्या मंत्र्यांची गच्छंती होण्याची शक्यता आहे. तर अनेक नवीन चेहरे मंत्रिमंडळ विस्तारात पाहायला मिळू शकतात. सध्या मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये २१ मंत्री आहेत. त्यासोबत ९ स्वतंत्र प्रभार आणि २३ राज्यमंत्री आहेत. या मंत्रिमंडळाची संख्या वाढण्याचे संकेत आहेत असं दिल्लीतील सूत्रांनी सांगितले आहे. दै.भास्करनं याबाबत वृत्त दिलं आहे. मोदी कॅबिनेट विस्तारात (Modi Cabinet Expansion) सध्या ज्योतिरादित्य शिंदे(Jyotiraditya Scindia) यांच्या नावाची चर्चा आहे.

कोणत्या नव्या चेहऱ्यांचा समावेश असू शकतो?

ज्योतिरादित्य शिंदे, दिनेश त्रिवेदी, भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, वरूण गांधी, जामयांग शेरिंग नामग्यालसारख्या चेहऱ्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं. तर २०२२ मध्ये उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडसह अन्य राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. ज्यामुळे या राज्यांच्या समीकरणावर विशेष लक्ष दिलं जाईल असं विश्लेषक म्हणतात. उत्तर प्रदेशमधून आलेल्या नेत्याला मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांना मोठं मंत्रालय देण्यात येऊ शकतं. जेणेकरून मंत्री थेट जनतेशी नाळ जोडतील.

सध्याच्या स्थितीत असे अनेक मंत्री आहेत ज्यांच्याकडे एकाहून अधिक विभागाची जबाबदारी आहे. ज्यात प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, स्मृती ईरानी, नितीन गडकरी, धर्मेंद्र प्रधान, नरेंद्र सिंह तोमर, डॉ. हर्षवर्धन, हरदीप सिंह पुरी यांच्या नावाचा समावेश आहे. मोदी कॅबिनेट विस्तारात यांच्याकडील खात्यांचा भार काढून घेतला जाऊ शकतो

या नावांचीही दिल्लीत चर्चा

सूत्रांच्या माहितीनुसार, सुशील मोदी, महाराष्ट्रातील नारायण राणे, भूपेंद्र यादव आणि आणखी एक ज्येष्ठ नेता ज्यांच्याकडे बिहारसोबत गुजरातच्या प्रभारीपदाची जबाबदारी आहे. त्यांनाही कॅबिनेटमध्ये स्थान मिळू शकतं. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरूण गांधी, अनिल जैन, जफर इस्लाम, रामशंकर कठेरिया, अनुप्रिया पटेल यांचाही समावेश असल्याची चर्चा आहे.

२०१९ मध्ये मोदी सरकारच्या स्थापनेनंतर जदयूला केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्याची ऑफर भाजपानं दिली होती. परंतु त्यावेळी केवळ एक मंत्रिपद जदयूला दिलं जात होतं. त्यामुळे जदयूने भाजपाची ऑफर नाकारली. आता जदयू २ वर्षानंतर भाजपा कॅबिनेटमध्ये सहभागी होण्यास तयार आहे. मात्र जदयूमध्ये मंत्रिपदासाठी अधिक दावेदार आहेत. पण सरकारमध्ये १ किंवा २ पेक्षा अधिक मंत्रिपद मिळण्याची शक्यता फार कमी आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाNarayan Raneनारायण राणे Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार