शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'युवराज आदित्य ठाकरेंच्या वरळीत कोरोना नाही का?'; पबमधला व्हिडीओ शेअर करत मनसेचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 11:00 IST

mns slams aditya thackeray: आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन; मुख्यमंत्र्यांचा आवाहनाला हरताळ

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. अनेक भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं पुन्हा निर्बंध लादण्याची वेळ आली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळण्याचं आवाहन सरकार, प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र अनेक ठिकाणी नियमांना हरताळ फासला जात असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) असाच एक प्रकार समोर आणला आहे.मनसेचे नेते संतोष धुरींनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. वरळीतील पबमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन सुरू असल्याचा प्रकार त्यांनी समोर आणला आहे. या माध्यमातून धुरींनी शिवसेनेचे नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंवर (Shiv Sena Leader Aditya Thackeray) निशाणा साधला आहे. 'मुख्यमंत्री ठाकरे पत्रकार परिषदेत कोरोना संपला नसल्याचं सांगतात. पण वरळीतल्या कमला मिलमध्ये १२ वाजून गेल्यानंतरही पब सुरू आहे. इतर ठिकाणी ११ वाजता पब बंद होतात. मग वरळीतले पब रात्रीचे १२-१ पर्यंत कसे काय सुरू असतात. यांना कोण परवानगी देतं?', असा सवाल धुरींनी उपस्थित केला.विरोधक आक्रमक, ठाकरे सरकारची आजपासून परीक्षा मनसेचे नेते संतोष धुरींनी कमला मिल कंपाऊंडमधल्या युनियन पबमधून फेसबुक लाईव्ह केलं. पबमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं सर्रास उल्लंघन होत असल्याचं व्हिडीओत दिसत होतं. पबमध्ये कोणतंही सोशल डिस्टन्सिंग नव्हतं. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हते. यावरून धुरींनी मंत्री आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं. 'आदित्य ठाकरेंच्या मतदासंघात सर्व नियम धाब्यावर बसवले जातात आणि मुख्यमंत्री सर्वसामान्यांना कोरोना गेलेला नसल्याचं सांगतात. सामान्य लोकांसाठी कोरोना आहे. पण श्रीमंतांसाठी कोरोना नाही. युवराज आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील ही परिस्थिती आहे,' असं धुरी म्हणाले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMNSमनसे