शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

कुंथत कुंथत सरकार चालत नाही; ठाकरे सरकारला राज ठाकरेंचा टोला

By कुणाल गवाणकर | Updated: October 29, 2020 16:19 IST

Raj Thackeray meets governor bhagat singh koshyari: मनसे प्रमुख राज ठाकरेंनी घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट

मुंबई: कुंथत कुंथत सरकार चालत नाही. हे कशासाठी इतके कुंथत आहेत, तेच मला कळत नाही, अशा शब्दांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी आहे. पण रेल्वे सेवा सुरू नाही. रेस्टॉरंट, हॉटेल सुरू आहेत. पण मंदिरं खुली करण्यास परवानगी नाही. हा नेमका काय प्रकार सुरू आहे, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला.राज्यात प्रश्नांची कमतरता नाही. पण निर्णयांची कमतरता आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली. 'राज्यात अनेक प्रश्न आहेत. अकरावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले आहेत. रेल्वे महिलांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र इतरांसाठी त्या बंदच आहेत. रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असताना रेल्वे सर्वसामान्यांसाठी बंद आहे. हॉटेल्स सुरू करण्यास मुभा आहे. पण मंदिरं खुली करण्यास अद्याप परवानगी नाही. या धरसोड वृत्तीमागचं कारण अद्याप मला समजलेलं नाही. सरकारनं एकदा नीट विचार करून काय सुरू काय बंद याची माहिती लोकांना द्यावी,' असं राज ठाकरे म्हणाले. “प्रश्न खूप पण निर्णयांचा अभाव”; राज ठाकरेंनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेटराज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे वाढलेल्या वीज बिलांचा प्रश्न मांडला. 'वीजबिलाचा विषय मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. वीजबिल कमी करू शकतो असं कंपन्यांचं म्हणणं आहे पण राज्य सरकारकडून यावर निर्णय होत नाही. राज्य सरकारनं तात्काळ वीजबिलासंदर्भात निर्णय घ्यायला हवा. कोणतीही गोष्ट सांगितली तर त्यावर काम सुरु आहे असं उत्तर मिळतं. पण निर्णय होत नाही, लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले. त्यात भरमसाठ वीजबिल येत आहेत, लोक बिल कुठून भरणार? बिल नाही भरलं तर वीज कापणार त्यामुळे सरकारने यावर लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी राज ठाकरेंनी केली.चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला; "शरद पवार घराबाहेर पडतात, पण..."लोकांना जिथे २ हजार बिल येत होतं तिथे १० हजार बिले येतंय. लोकांना वीजबिलाचा मोठा फटका बसतोय, राज्य सरकारला या विषयाशी कल्पना आहे. लवकरात लवकर या समस्येवर तोडगा निघावा, याबाबत लवकरच शरद पवार यांच्याशी बोलणार आहे, गरज पडल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही भेटणार आहे असं त्यांनी सांगितलं.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी