शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

राफेल व्यवहारात मोदींकडून पंतप्रधान कार्यालयाचा गैरवापर, काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 05:56 IST

राफेल विमाने खरेदी व्यवहारात द सॉल्ट एव्हिएशन या कंपनीचा फायदा करून देण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान कार्यालयाचा गैरवापर केला आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

नवी दिल्ली : राफेल विमाने खरेदी व्यवहारात द सॉल्ट एव्हिएशन या कंपनीचा फायदा करून देण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान कार्यालयाचा गैरवापर केला आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. त्यामुळे भ्रष्टाचार निर्मूलन कायद्यान्वये त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करता येऊ शकते, असेही त्या पक्षाने म्हटले आहे.काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीपसिंह सूरजेवाला यांनी पत्रकारांना सांगितले की, राफेल विमाने खरेदी व्यवहाराबाबत बोलणी करून भारतीय शिष्टमंडळानेघेतलेला अंतिम निर्णय बाजूला सारण्यात आला. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने बोलणी करून या विमानांच्या खरेदीबाबत अंतिम निर्णय घेतला. राफेल विमानांच्या खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याच्या काँग्रेसने याआधीही केलेल्या आरोपांचा केंद्र सरकारने वेळोवेळी इन्कार केला आहे. राफेलबाबत खोटेनाटे आरोप करून काँग्रेस जनतेची दिशाभूल करत आहे, असे प्रत्युत्तर भाजपानेही दिले होते.राफेलचा व्यवहार ६४ हजार कोटींचासूरजेवाला यांनी दावा केला की, यूपीए सरकारने ठरविलेल्यापेक्षा कितीतरी जास्त किमतीने मोदी सरकार राफेल विमाने खरेदी करत आहे. तसेच बँकेची हमीही या सरकारने रद्द केली. ३६ राफेल विमाने ५९ हजार कोटी रुपयांना विकत घेत असल्याचा मोदी सरकारचा दावा खोटा आहे. या खरेदीसंदर्भात बोलणी करणाऱ्या भारतीय शिष्टमंडळाने हा आकडा ६४ हजार कोटी रुपये असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राफेलप्रकरणी केंद्र सरकार संसदेची दिशाभूल करत आहे असाही आरोप त्यांनी केला. राफेल व्यवहारात मोदींनी आपले उद्योगपती मित्र अनिल अंबानी यांचा ३० हजार कोटी रुपयांचा फायदा करून दिला असा आरोपही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नेहमीच करत असतात.

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९