शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

'मेट्रो मॅन' ई. श्रीधरन केरळच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार, भाजपाकडून शिक्कामोर्तब 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 15:39 IST

Kerala Assembly Elections 2021: ई. श्रीधरन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थक मानले जातात.

ठळक मुद्देकेरळमध्ये सर्व १४ जिल्ह्यांतील १४० विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात ६ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे.

नवी दिल्ली : केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने (भाजपा) आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची गुरुवारी घोषणा केली आहे. 'मेट्रो मॅन' ई. श्रीधरन यांची केरळच्यामुख्यमंत्री पदाचे उमेदावर म्हणून भाजपाने नियुक्ती केली आहे. 

दोन आठवड्यांपूर्वी ई. श्रीधरन यांनी भाजपात प्रवेश केला होता. केरळमधील भाजपाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून येथील प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रन यांनी ई. श्रीधरन यांच्या नावाची घोषणा केली.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केरळमध्ये सर्व १४ जिल्ह्यांतील १४० विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात ६ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. तर २ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे केरळमध्ये आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. 

ई. श्रीधरन यांच्याविषयी...८८ वर्षांचे ई. श्रीधरन हे भारताचे प्रसिद्ध सिव्हिल इंजीनिअर आहेत. १९९५ ते २०१२ या काळात ते दिल्ली मेट्रोचे संचालक होते. दिल्ली मेट्रोची योजना यशस्वीपणे अंमलात आणण्यामागे ई. श्रीधरन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. दिल्ली मेट्रोशिवाय कोलकाता मेट्रो, कोचीन मेट्रो आणि देशात वेगवेगळ्या ठिकाणी राबवण्यात आलेल्या मेट्रो प्रकल्पांतही ई. श्रीधरन यांचे योगदान मोलाचे आहे. त्यामुळेच त्यांना 'मेट्रोमॅन' म्हणून ओळखले जाते. तसेच,  भारत सरकारने २००१ मध्ये त्यांचा पद्मश्री आणि २००८ मध्ये पद्मविभूषणने पुरस्काराने गौरव केला आहे. 

मोदींचे समर्थक मानले जातातई. श्रीधरन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थक मानले जातात. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन वेळा त्यांनी नरेंद्र मोदींना एक चांगला नेता म्हणून संबोधले होते. पंतप्रधानपदाच्या मोदींच्या दाव्याचे समर्थन करणाऱ्यांमध्येही ई. श्रीधरन यांचे नाव होते.

टॅग्स :Kerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१KeralaकेरळBJPभाजपाPoliceपोलिसChief Ministerमुख्यमंत्री