शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरु; धनंजय मुंडेंबाबत निर्णय की चर्चा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 13:21 IST

Dhananjay Munde News: धनंजय मुंडे हे आज पहाटे कोणताही ताफा, सुरक्षा न घेता खासगी गाडीतून चित्रकुट बंगल्यावर दाखल झाले. आता ते काही दिवस तिथूनच काम पाहणार असल्याचे समजते. तर मुंडेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार आणि छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे. आता पवार काय निर्णय घेतात, यावर मुंडेंचे राजकारण अवलंबून असल्याचे समजते. 

मुंबई : महिलेसोबत असलेले नाजूक संबंध, तिच्या बहिणीने केलेले बलात्काराचे आरोप आणि महिलेपासून असलेल्या दोन मुलांचा स्वीकार या विषयावरून गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडविणाऱ्य़ा धनंजय मुंडे यांच्याबाबत राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट केली आहे. तरीही आज राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरु झाली असून यामध्ये  धनंजय मुंडेंबाबत निर्णय की चर्चा होणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. 

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  धनंजय मुंडे प्रकरणावर जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केल्याचे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला आहे. आता सुरु झालेल्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल पटेल उपस्थित आहेत. तर धनंजय मुंडे हे आज पहाटे कोणताही ताफा, सुरक्षा न घेता खासगी गाडीतून चित्रकुट बंगल्यावर दाखल झाले. आता ते काही दिवस तिथूनच काम पाहणार असल्याचे समजते. तर मुंडेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार आणि छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे. आता पवार काय निर्णय घेतात, यावर मुंडेंचे राजकारण अवलंबून असल्याचे समजते. 

आमदारकी रद्द होणार का? कायदेतज्ज्ञांना वाटतं...

जयंत पाटील काय म्हणाले...एकीकडे विरोधक जरी आक्रमक झाले असताना धनंजय मुंडे यांनी बुधवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्वतंत्रपणे भेट घेत त्यांची बाजू मांडली. तसेच  धनंजय मुंडे मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीस मुंडे उपस्थित होते. मंत्रिपदाचा राजीनामा देण्याबाबत धनंजय मुंडे द्विधा मन:स्थितीत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. शेवटी, शरद पवार त्यांना काय आदेश देतात, यावरच सगळे अवलंबून असेल, असे मानले जाते. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची शक्यता फेटाळली आहे. 

जयंत पाटील धनंजय मुंडे प्रकरणाबाबत म्हणाले की, राजकीय आयुष्यामध्ये एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचण्यासाठी बराच संघर्ष करावा लागतो. अशावेळी कोणी काही आरोप करत असेल तर त्याची आधी चौकशी होणे आवश्यक आहे. सत्यता न पडताळता निष्कर्षावर येणे योग्य नाही, असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारJayant Patilजयंत पाटीलRapeबलात्कार