शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या महानंदचे अखेर गुजरातच्या एनडीडीबीकडे हस्तांतरण; मदर डेअरीने घेतला ताबा
2
"१५ तास घ्या, तुम्हाला कोण घाबरतंय, आम्ही इथंच बसलो आहोत", असदुद्दीन ओवेसींचे नवनीत राणा यांना आव्हान
3
"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला
4
'संपूर्ण बकवास...', सॅम पित्रोदा यांच्या चिनी-आफ्रिकन वक्तव्यावर रॉबर्ट वाड्रा संतापले
5
"मेरा बाप महागद्दार है..."; प्रियंका चतुर्वेदींच्या टीकेला शिवसेनेचं जशास तसं प्रत्युत्तर
6
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
7
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
8
मराठी चित्रपटाचा सातासमुद्रापार डंका, अमेरिकेत 'स्वरगंधर्व सुुधीर फडके'चे शो हाऊसफुल्ल!
9
भाईजानच्या सिनेमात श्रीवल्लीची एन्ट्री! सलमानच्या 'सिकंदर'ची हिरोईन बनणार रश्मिका मंदाना
10
अक्षय्य तृतीया: अन्नपूर्णा स्वरुपातील स्वामींचे करा स्मरण, मिळेल अक्षय्य पुण्यफल; कसे? पाहा
11
मोदींची प्रकृती बरी नाही, भाजपाने त्यांना प्रचारातून बाजूला करावं; संजय राऊतांचा टोला
12
Video - ज्या व्यक्तीला बेघर समजून चिमुकल्याने दिले सर्व पैसे तो निघाला अब्जाधीश अन् मग...
13
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक! आज स्वस्त झालं Gold, पाहा नवे दर
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती
15
AI लक्ष्मीकांत बेर्डेंचा अनुभव देऊ शकत नाही, लेक अभिनय बेर्डेने स्पष्टच सांगितलं
16
३ दहशतवादी ठार, ४० तास चालली चकमक; लष्कराची मोठी कारवाई
17
दीपिकाबरोबर घटस्फोटाच्या चर्चांना रणवीरने दिला पूर्णविराम! लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर म्हणतो- "माझ्या पत्नीने..."
18
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
19
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
20
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...

‘ती’ भेट झालीच नाही, पवार-शहा भेटीची नुसतीच चर्चा, राष्ट्रवादीकडूनही खंडन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 8:47 AM

Pawar-Shah meeting News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यात अहमदाबादमध्ये गुप्त भेट झाल्याची चर्चा रविवारी दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली होती.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यात अहमदाबादमध्ये गुप्त भेट झाल्याची चर्चा रविवारी दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, अशी कोणतीही भेट झालीच नसल्याचे स्पष्ट होत आहे. एका गुजराती वर्तमानपत्राने या तिघांमध्ये अहमदाबादमधील फार्म हाऊसवर गुप्त भेट झाल्याचे वृत्त दिले होते.  (That meeting did not take place, only the Pawar-Shah meeting was discussed, even the NCP denied it)राष्ट्रवादी काँग्रेसशी निकटचे संबंध असलेल्या उच्चपदस्थ सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार शरद पवार आणि प्रफुल पटेल शुक्रवारी, २६ मार्च रोजी उद्योगपती गौतम अदानी यांच्या कुटुंबातील विवाहसोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अहमदाबादेत आले. वस्तुत: हा विवाहसोहळा शनिवारी, २७ मार्च रोजी होता. परंतु अदानी परिवारातील आनंदसोहळ्यात सहभागी होण्यासाठी दोन्ही नेते आदल्या दिवशीच अहमदाबादमध्ये आले. पवार आणि पटेल दोघेही जण अहमदाबादेत असतानाच अमित शहा यांचेही शहरात आगमन झाले. मात्र, पवार आणि पटेल यांनी शहा यांची भेट घेतली नाही. या तिघांमध्ये भेट झाल्याची नुसतीच चर्चा रविवारी प्रसारमाध्यमांमध्ये रंगली होती.ृत्त दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसशी निकटचे संबंध असलेल्या उच्चपदस्थ सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार शरद पवार आणि प्रफुल पटेल शुक्रवारी, २६ मार्च रोजी उद्योगपती गौतम अदानी यांच्या कुटुंबातील विवाहसोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अहमदाबादेत आले. वस्तुत: हा विवाहसोहळा शनिवारी, २७ मार्च रोजी होता. परंतु अदानी परिवारातील आनंदसोहळ्यात सहभागी होण्यासाठी दोन्ही नेते आदल्या दिवशीच अहमदाबादमध्ये आले. पवार आणि पटेल दोघेही जण अहमदाबादेत असतानाच अमित शहा यांचेही शहरात आगमन झाले. मात्र, पवार आणि पटेल यांनी शहा यांची भेट घेतली नाही. या तिघांमध्ये भेट झाल्याची नुसतीच चर्चा रविवारी प्रसारमाध्यमांमध्ये रंगली होती.

ही निव्वळ अफवा : नवाब मलिकशरद पवार आणि अमित शहा यांच्यात कोणतीही भेट झालेली नाही. ही निव्वळ अफवा असून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी रविवारी सायंकाळी स्पष्ट केले. यासंदर्भातील ज्या बातम्या पसरवण्यात आल्या त्या खोट्या आहेत. कोणतीही भेट झालेली नाही. गृहमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे संभ्रम रविवारी अमित शहा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांच्याशी भेट झाली किंवा कसे, या प्रश्नावर थेट उत्तर न देता ‘राजकारणात सर्वच गोष्टी उघड करायच्या नसतात’, असे सूचक विधान करत संभ्रम वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विचारलेल्या प्रश्नाला बगल देत शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानावर मतप्रदर्शन करत भाजप तेथे प्रचंड मताधिक्याने विजयी होईल, असा दावा केला.  योग्य वेळी सर्व  उघड होईलखुद्द शरद पवार यांनी या वृत्ताचे खंडन का नाही केले, असे विचारले असता ‘योग्य वेळी हे सर्व उघड होईल. पवार साहेबांची ती सवय नाही. ते योग्य वेळेची निवड स्वत:च करतात’, असे राष्ट्रवादी काँग्रेसशी निकटचे संबंध असलेल्या उच्चपदस्थ सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले. हे तर केवळ कल्पनारंजन- उष्मा मल्लअहमदाबाद : शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये अमित शहा यांची भेट घेतली, हे  केवळ कल्पनारंजन आहे. या वृत्तात कोणतेही तथ्य नाही. पवार आणि  पटेल काही संस्थांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी अहमदाबादला आले होते.  योगायोगाने अमित शहा हेही शहरात होते; परंतु त्यांची भेटच झाली नसल्याने बैठकीचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्यामुळे या तिघांमध्ये बैठक झाली आणि त्यात सरकार बनविण्याची चर्चा झाली यात काही तथ्य नाही.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAmit Shahअमित शहाPoliticsराजकारण