शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा राज ठाकरे म्हणतात, "मी मास्क घालत नाही, तुम्हालाही सांगतोय..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 12:47 IST

MNS Raj Thackeray : आज मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे उपस्थित होते.

ठळक मुद्देआज मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे उपस्थित होते.राज ठाकरेंनी मास्कही केला नव्हता परिधान

मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं शनिवारी मुंबईकतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी या कार्यक्रमाला मनसे प्रमुख राज ठाकरे हेदेखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी मास्क परिधान केलं नव्हंत. यावरून त्यांना पत्रकारांनी तुम्ही मास्क परिधान केला नाही असा सवाल केला. यावर उत्तर देताना मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय असं म्हणत उत्तर दिलं. सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. अशातच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला होता. तसंच नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहनही केलं होतं. शनिवारी मराठी भाषा दिनानिमित्त राज ठाकरे यांनी कार्यक्रमाला उपस्थित झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे उपस्थित होते. यावेळी त्यांना मास्क न घालण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी मी मास्क घालत नाही, तुम्हालाही सांगतोय, असं उत्तर दिलं. "राज्यात अनेक कार्यक्रमांना गर्दी होते. सरकारच्या कार्यक्रमांनाही गर्दी होते. सरकारचे मंत्री किंवा इतर लोकं गर्दी करून धुडगुस घालू शकतात. शिवजयंतीला, मराठी भाषा दिनी मात्र नकार दिला जातो. कोरोनाचं संकट परत येतंय असं वाटत असेल तर सर्व निवडणुकाही पुढे ढकलल्या पाहिजेत. वर्षभरानं निवडणुका पुढच्या वर्षी घ्या, काहीही फरक पडत नाही," असंही ते म्हणाले.

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेMumbaiमुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या