शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

"हिंमत असेल तर अमेय खोपकरांना अटक करून दाखवाच"; मनसेचा ठाकरे सरकारला इशारा

By प्रविण मरगळे | Updated: February 26, 2021 15:42 IST

MNS Sandeep Deshpande Warns to Thackeray Government: हे सरकार अमराठी आहे की काय? नियोजित कार्यक्रम आम्ही सर्व नियम पाळून करणार म्हणजे करणारच असा अमेय खोपकरांनी ठणकावून सांगितलं आहे.

ठळक मुद्देसंजय राठोडासारख्या मंत्र्याचे समर्थक लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन शक्तीप्रदर्शन करतातअशा गर्दीवर कारवाई करण्याची ज्यांच्यात धमक नाही, त्यांच्या डोळ्यात मराठी भाषा दिवस का खुपतो?सरकारने कोरोनाचं कारण देत परवानगी नाकरलीच पण कारवाईचा धाक दाखवला

मुंबई – मराठी राजभाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर मनसे-शिवसेना यांच्यातील वाद विकोपाला पोहचला आहे. मराठी भाषा दिनादिवशीमनसेकडून मराठी स्वाक्षरी मोहीमेचं आयोजन करण्यात येतं, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मनसेच्या या मोहिमेला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली असून आयोजक अमेय खोपकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे.(Arrest Ameya Khopkar and show it, MNS Sandeep Deshpande warned the Thackeray government over Controversy on Marathi Bhasha Din Programme)  

मात्र अमेय खोपकरांना नोटीस पाठवल्यामुळे मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. हिंमत असेल तर अमेय खोपकरांना अटक करून दाखवाच असं विधान केले आहे, त्यामुळे मनसे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. कोविड नियमांचे पालन करूनच मनसेने मराठी भाषा दिन कार्यक्रम आयोजित केला होता, तरीही सरकारने कोरोनाचं कारण देत परवानगी नाकरलीच पण कारवाईचा धाक दाखवला असल्याचा आरोप अमेय खोपकर यांनी केला.

काय म्हणाले अमेय खोपकर?

ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत अशा संजय राठोडासारख्या मंत्र्याचे समर्थक लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन शक्तीप्रदर्शन करतात, अशा गर्दीवर कारवाई करण्याची ज्यांच्यात धमक नाही, त्यांच्या डोळ्यात मराठी भाषा दिवस का खुपतो? महाबिघाडी सरकारचं डोकं ठिकाणावर नाही यावर शिक्कामोर्तबच झालंय, पण त्यापुढे जाऊन आता शंका यायला लागली आहे की, हे सरकार अमराठी आहे की काय? नियोजित कार्यक्रम आम्ही सर्व नियम पाळून करणार म्हणजे करणारच असा अमेय खोपकरांनी ठणकावून सांगितलं आहे.

या सरकारला अमराठी का म्हणू नये? मराठी स्वाक्षरी कार्यक्रमास परवानगी नाकारल्याने मनसेचा संताप

राज ठाकरेंचं मराठी माणसांना आवाहन

महाराष्ट्रात मराठी राजभाषा दिन साजरा करण्याच्या निमित्ताने आठवडाभर काही थोडेफार शासकीय कार्यक्रम होतील, काही एक घोषणा होतील, मराठी भाषेच्या अस्तित्वाबद्दल चिंता व्यक्त केली जाईल आणि पुढचे ३५८ दिवस या सगळ्याचा विसर पडेल. मराठीचं काय होणार? यापेक्षा ती कशी अधिक समृद्ध होईल, ती रोजच्या वापरात कशी येईल आणि ती आपली ओळख कशी बनेल याचा विचार करणं आणि त्यासाठी कृती करणे हे जास्त महत्त्वाचे आहे.(Raj Thackeray Letter to Marathi People)

“राज ठाकरेंचं मराठी माणसांना पत्र; “आपली मराठी भाषा इतकी लेचीपेची अजिबात नाही की...”

या भाषेने हिंदवी स्वराज्याचा हुंकार दिला, ह्या भाषेने स्वराज्याचा मंत्र दिला या भाषेने प्रबोधनाचा विचार दिला या भाषेने श्रमिक एकजुटीचा विचार दिला, ह्या भाषेने देशाला मार्गदर्शक विचार दिला अशा भाषेचं काय होईल याची चिंता करण्यापेक्षा, आपल्या भाषेचं संचित स्मरून इतके अफाट विचार पेलवण्याची आणि मुळात जन्माला घालण्याच्या ताकदीचा अभिमान बाळगत... ती ज्ञानभाषा आणि व्यापाराची भाषा बनावी म्हणून आग्रही राहिलो तरी पुरेसं आहे. मराठी राजभाषेच्या निमित्ताने एक सुरुवात केली तर आपण एक मोठा पल्ला गाठू तो म्हणजे आपण आपली स्वाक्षरी जी आपली ओळख असते ती मराठीत सुरू करूया. त्याची सुरुवात करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्रातील शाखा शाखांमध्ये फलक लावलेले असतील त्या ठिकाणी सहकुटुंब जाऊन मराठीत स्वाक्षरी करा आणि त्याच वेळेला आपली मराठी भाषा अधिक मोठी करण्याची प्रतिज्ञा करा असं आवाहन राज ठाकरेंनी मराठी लोकांना केलं आहे.

टॅग्स :MNSमनसेMarathi Bhasha Dinमराठी भाषा दिनShiv SenaशिवसेनाRaj Thackerayराज ठाकरेSandeep Deshpandeसंदीप देशपांडे