शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मंडलिक यांचे राष्ट्रवादीपुढे कडवे आव्हान, काँग्रेसच्या सतेज पाटील यांचे बंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 04:42 IST

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदारांनी किती विकासकामे केली, यापेक्षा त्यांनी किती पक्षविरोधी भूमिका घेतल्या, याचभोवती निवडणूक फिरत आहे

- विश्वास पाटीलकोल्हापूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदारांनी किती विकासकामे केली, यापेक्षा त्यांनी किती पक्षविरोधी भूमिका घेतल्या, याचभोवती निवडणूक फिरत आहे. शिवसेनेच्या प्रा. संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्यापुढे कडवे आव्हान उभे केले आहे.भाजप-शिवसेनेने येथे राज्याच्या प्रचाराचा नारळ फोडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच त्यांनी हवा निर्माण करण्यात यश मिळविले. त्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दोनदौरे करून काही जोडण्या लावल्या आहेत.

उमेदवार म्हणून प्रतिमा आणि विकासकामे करण्यातही महाडिक यांचा पुढाकार राहिला. संसदेत उत्तम छाप पाडल्यानेच पक्षांतर्गत विरोध असतानाही शरद पवार यांनी त्यांनाच उमेदवारी दिली. मात्र, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी त्यांच्या विरोधात उघड बंड पुकारले व महाडिक यांच्या पक्षविरोधी भूमिकांचा पाढा वाचला. त्यातून वातावरण बदलत गेले. महाडिक कुटुंबात सत्तेची पदे एकवटल्याची नाराजीही आहे. जिल्ह्याचे राजकारण मुठीत ठेवण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा लोकांना आवडलेली नाही. महाडिक यांना मात्र लोक चांगल्या कामाची पोहोचपावती म्हणून पुन्हा संधी देतील, असा विश्वास वाटतो.
मंडलिक यांच्यासाठी शिवसेना-भाजप एकजुटीने कामास लागली आहे. काही झाले, तरी यावेळेला खासदार करायचाच, या जिद्दीने शिवसेना मैदानात उतरली आहे. तर मंडलिक दुपारी बाराला उठतात, सायंकाळी सातनंतर नॉट रिचेबल असतात. वडिलानंतर हे पदमिळायला खासदारकी म्हणजे काय अनुकंपाची नोकरी आहे का? असे मुद्दे उपस्थित करून मंडलिक यांच्या दुखऱ्या बाजू महाडिक गट नेटाने मांडत आहे.वंचित बहुजन आघाडीने डॉ. अरुणा माळी यांना उमेदवारी दिली आहे. अटीतटीच्या लढतीत त्यांची मते ही राष्ट्रवादीचीच डोकेदुखी वाढविणारी ठरण्याची चिन्हे आहेत.>कळीचे मुद्देपक्षापेक्षा उमेदवाराचे कर्तृत्व आणि खासदार म्हणून पाडलेली छाप यावर राष्ट्रवादीचा भर आहे.विकासाच्या प्रश्नांपेक्षा उमेदवाराचा दलबदलूपणा आणि भावनिक मुद्द्यांवर निवडणूक केंद्रित होताना दिसत आहे.>गेल्या २५ वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात खासदार म्हणून जेवढी कामे झाली नाहीत, तेवढी कामे मागच्या पाच वर्षांत करून दाखविली आहेत. संसदेच्या कामांत उत्तम छाप पाडली आहे. याची मतदार नक्कीच दखल घेतील.- धनंजय महाडिक,राष्ट्रवादी काँग्रेस>‘संसदरत्न’ पुरस्काराचा टेंभा मिरविणाºया विद्यमान खासदारांनी जिल्ह्यातील विकासाकडे लक्ष दिले नाही. प्रत्येक वेळी सोईनुसार राजकीय भूमिका घेणाऱ्यांना मतदार या निवडणुकीत चांगला धडा शिकवतील.- प्रा. संजय मंडलिक,शिवसेना

टॅग्स :Dhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019kolhapur-pcकोल्हापूर