शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

भाजपाला सत्तेतून हटवण्यासाठी ममता बॅनर्जींची रणनीती; विरोधकांनी दिल्लीत महत्त्वाची बैठक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 05:55 IST

ममता यांच्या पुढाकाराने विरोधकांची बुधवारी बैठक, आघाडीबाबत होणार चर्चा 

ठळक मुद्देममता २६ ते ३० जुलै या कालावधीत दिल्लीचा दौरा करणार आहेत. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी भेट घेतीलविरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी सुरू असलेल्या बैठका कोणत्याही नेत्याच्या घरी आयोजित करायच्या नाहीतआता तमाम विरोधी पक्षांची येत्या बुधवारी बैठक बोलाविण्यात तृणमूल काँग्रेसनेच पुढाकार घेतला आहे

कोलकाता : केंद्रातून भाजपला सत्तेवरून हटविण्यासाठी विरोधी पक्षांची आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नांत आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला आहे. विरोधी पक्षांची एक बैठक दिल्लीतील वंग भवनमध्ये बुधवारी (दि. २८) होणार असून, त्याला ममता बॅनर्जी उपस्थित राहाणार आहेत. 

ममता २६ ते ३० जुलै या कालावधीत दिल्लीचा दौरा करणार आहेत. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी भेट घेतील व त्यानंतर दुपारी ३ वाजता वंग भवनमधील बैठकीलाही उपस्थित राहातील, असे तृणमूल काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी सुरू असलेल्या बैठका कोणत्याही नेत्याच्या घरी आयोजित करायच्या नाहीत, असे ठरविण्यात आले आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक बैठक बोलवावी, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांना दि. २१ जुलै रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत केले होते. आता तमाम विरोधी पक्षांची येत्या बुधवारी बैठक बोलाविण्यात तृणमूल काँग्रेसनेच पुढाकार घेतला आहे. या बैठकीच्या तयारीसाठी तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी व निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर सध्या दिल्लीत तळ ठोकून आहेत. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांत भाजपचा पराभव करून ममता बॅनर्जी पुन्हा सत्तेवर आल्या. 

अभिषेक बॅनर्जीही झाले सक्रियममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांना तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस करण्यात आले आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपशी लढा देण्याकरिता आता तृणमूल काँग्रेसने दिल्लीतूनही प्रयत्न करावे, असा त्यांचा विचार आहे. तो त्यांच्या पक्षाने उचलून धरला. २२ जून रोजी तृणमूल काँग्रेसचे उपाध्यक्ष यशवंत सिन्हा यांनी शरद पवार यांची दिल्लीत भेट घेऊन विरोधी पक्षांच्या एकत्र येण्याबाबत चर्चा केली होती. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीSharad Pawarशरद पवारBJPभाजपा