Mamata Banerjee: ममता बॅनर्जी आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; जे पी नड्डा आंदोलनाला बसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 08:24 AM2021-05-05T08:24:49+5:302021-05-05T08:25:25+5:30

Mamata Banerjee Oath Ceremony: एकीकडे कोलकात्यात ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत, तर दुसरीकडे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे बंगालधील हिंसाचाराविरोधात धरणे धरणार आहेत.

Mamata Banerjee Oath Ceremony: Mamata Banerjee will be sworn in as CM today; JP Nadda will start agitation | Mamata Banerjee: ममता बॅनर्जी आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; जे पी नड्डा आंदोलनाला बसणार

Mamata Banerjee: ममता बॅनर्जी आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; जे पी नड्डा आंदोलनाला बसणार

googlenewsNext

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत (West Bengal Assembly Election) तृणमूल काँग्रेसने (TMC) मोठा विजय प्राप्त केला आहे. मात्र, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा पराभव झाला आहे. यानंतर बंगालमध्ये हिंसाचार उफाळला होता. या साऱ्या राजकीय कोलाहलात ममता बॅनर्जी या आज सकाळी 10.45 वाजता राजभवनात शपथ घेणार आहेत. राजभवनात हा कार्यक्रम साधेपणाने केला जाणार आहे. (Mamata Banerjee will take oath of CM for Third time in Kolkata.)


एकीकडे कोलकात्यात ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत, तर दुसरीकडे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष (BJP Chief) जे पी नड्डा (J.P. Nadda) हे बंगालधील हिंसाचाराविरोधात धरणे धरणार आहेत.कोरोना महामारी पाहता ममता बॅनर्जी यांनी शपथ समारंभाला 50 लोकांनाच निमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य, बंगालचे भाजपा अध्यक्ष दिलीप घोष, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी आमि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचा समावेश आहे. 


शपथ ग्रहणाचा हा कार्य़क्रम 55 मिनिटांचा असणार आहे. यानंतर ममता थेट नबन्नायेथे जाार आहेत. तिथे ममतांना गार्ड ऑफ ऑनर दिले जाईल. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल 213 जागा जिंकून तिसऱ्यांदा सत्तेत आली आहे. भाजपाने 77 जागांवर विजय मिळविला आहे. यामुळे प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजपा राहणार आहे. 
बंगाल विधानसभा निकालानंतर हिसाचार उफाळला होता. यावर केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. सोमवारी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्य सरकारकडे अहवाल मागविण्यात आला होता. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपाल जगदीप धनखड यांना फोन करून चिंता व्यक्त केली होती. तसेच हिंसा रोखण्यासाठी पाऊले उचलण्यास सांगितले होते. 


निकालानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होऊ लागले असून भाजपाचे जे पी नड्डा यांनी देशाच्या फाळणीवेळसारखी हिंसा असल्याची टीका केली आहे. हिसेविरोधात दोन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. नड्डा यांनी दक्षिण परगना आणि कोलकाताच्या बेलेघाटामध्ये हिसेत मृत झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले. आज भाजपा देशभरात धरणे आंदोलन करणार आहे. 

Web Title: Mamata Banerjee Oath Ceremony: Mamata Banerjee will be sworn in as CM today; JP Nadda will start agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.