शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha 2024: 'सांगोला'मध्ये ठाकरेंविरोधात पुन्हा 'सांगली पॅटर्न'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 17:06 IST

Maharashtra vidhan sabha election : लोकसभा निवडणुकीत जे सांगली लोकसभा मतदारसंघात घडले, तोच पॅटर्न आता सांगोला मतदारसंघात ठाकरेंविरोधात होण्याची शक्यता दाट झाली आहे. ती कशी हेच समजून घ्या...

Maha Vikas Aghadi Maharashtra Election 2024: लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीमध्ये सांगली मतदारसंघाबद्दल काय घडलं, ते सगळ्या महाराष्ट्राने पाहिले. काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या या जागेवर ठाकरेंनी दावा केला आणि जागावाटपा आधीच उमेदवारही जाहीर केला. काँग्रेसच्या नेत्यांनी आणि मतदारांनी आघाडी धर्म बाजूला ठेवून अपक्ष विशाल पाटलांना विजयी केले. यालाच सांगली पॅटर्न म्हटलं गेलं. असेच काही राजकीय स्थिती सांगोला विधानसभा मतदारसंघात निर्माण झाली आहे. ठाकरेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या दीपक साळुंखे यांना उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडणार, हे स्पष्ट झाले आहे. 

शिवसेनेची जागा, पेच काय?

सांगोला मतदारसंघातून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे शहाजीबापू पाटील निवडून आले होते. शिवसेनेतील फुटीनंतर ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेले. त्यामुळे ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. 

गेल्यावेळी शिवसेनेने ही जागा जिंकलेली असल्याने ठाकरेंनी या जागेवर दावा केला आहे. दुसरीकडे शेतकरी कामगार पक्षाचा हा परंपरागत मतदारसंघ आहे. स्वर्गीय गणपतराव देशमुखांना या मतदाराने विजयी केले आहे. २०१९ मध्ये त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आणि शहाजीबापू पाटील अवघ्या काही मतांनी विजयी झाले. या जागेसाठी शेतकरी कामगार पक्ष आग्रही आहे.  

शेतकरी कामगार पक्षाचा दावा

गेल्यावेळी शेतकरी कामगार पक्षाकडून अनिकेत देशमुख यांनी निवडणूक लढवली. त्यांना ९८,६९६ इतकी मते मिळाली होती. विजयी झालेल्या शहाजीबापू पाटील यांना ९९,४६४ इतकी मते मिळाली होती. शहाजीबापू पाटलांनी ७६८ मतांनी देशमुखांचा पराभव केला होता. 

यावेळी ज्यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत, ते दीपक साळुंखे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढले होते. त्यांना ९१५ मते मिळाली होती. 

सांगोलामध्ये जागावाटपाचा वाद काय?

शेतकरी कामगार पक्षाकडून अनिकेत देशमुख यांनी पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुकीवेळीच शरद पवारांनी त्यांना आपल्या बाजूने घेतले होते. त्याचवेळी सांगोलातून ते महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, अशी चर्चा झाली होती. 

आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने साळुंखे यांना प्रचाराला लागण्याचे सांगितल्यानंतर अनिकेत देशमुख यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. शेतकरी कामगार पक्षही यामुळे नाराज आहे. दोन्ही शिवसेना उमेदवार आणि शेकापचे अनिकेत देशमुख अशी तिहेरी लढत या मतदारसंघात असेल.

शेकापने महाविकास आघाडीत राहून अनिकेत देशमुखांना ताकद दिली, तर त्याचा सगळ्यात जास्त फटका ठाकरेंच्या उमेदवारालाच बसेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे माजी आमदार स्व. गणपतराव देशमुख यांच्याबद्दल या मतदारसंघात आदर आणि सहानुभूती आहे. त्याचा फायदाही अनिकेत देशमुख यांना होईल.  यात आणखी एक फॅक्टर म्हणजे काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ठाकरेंच्या उमेदवाराला किती साथ देतील, हाही असेल. त्यामुळे सांगोलामध्ये पुन्हा सांगली पॅटर्न होऊ शकतो, ही चर्चा जोरात सुरू झाली आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024sangole-acसांगोलाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरे