शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019 : ४० तरुण चेहऱ्यांना काँग्रेस देणार संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 04:54 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे जागा वाटप निश्चित झाले

- अतुल कुलकर्णी मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे जागा वाटप निश्चित झाले असून प्रत्येकी १२५ जागा लढवाव्यात यावर दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे एकमत झाले आहे. १२५ पैकी ४० जागांवर तरुण चेहरे देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.काँग्रेस पक्षाकडील १२५ पैकी ६१ मतदारसंघाची नावे केंद्रीय निवड समितीत अंतिम करण्यात आली असून उर्वरित नावे १८ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे होणाºया बैठकीत चर्चेला घेतली जातील. छाननी समितीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे यांनीच वयाच्या बाबतीत स्पष्ट भूमिका घेतल्याचे सुत्रांनी सांगितले. ज्या ठिकाणी वयस्क, अथवा अती वयस्क उमेदवार किंवा विद्यमान आमदार असतील आणि तेथे पक्षाकडे दुसरा उमेदवारच नसेल अशा ठिकाणांची यादी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र जेथे तरुण चेहरे पक्षाकडे असतील तेथे त्यांनाच प्राधान्य द्या, असे सांगण्यात आले आहे. त्यानुसारच ४० तरुण चेहरे निश्चित करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आमच्याकडील अनेक नेते भाजप शिवसेनेत गेल्यामुळे तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. त्यामुळे त्यांना आपले नेतृत्व सिध्द करण्याची संधी मिळणार आहे.अनेक तरुण नेते पंचायत समिती, जिल्हापरिषद पातळीवर चांगले काम करत आहेत पण विद्यमान नेतृत्वामुळे त्यांना संधी मिळत नव्हती, ती आता त्यांना चालून आली आहे.जे गेले त्यांनी उलट या तरुणांना मदत करण्याचेच काम केले आहे, आता हे तरुण आपण काय करु शकतो हे दाखवून देतील असेही तांबे यावेळी म्हणाले.>मंगळवारी काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठकआघाडीच्या जागा वाटपात ३८ जागा मित्रपक्षांसाठी देण्यात येणार असून त्यात समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट, रिपाइं (गवई गट), रिपाइं (कवाडे गट), शेतकरी कामगार पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा समावेश असून दोन्ही पक्षाच्या नेत्यांची बसपासोबत चर्चा सुरु आहे. मंगळवारी काँग्रेस व राष्टÑवादीच्या नेत्यांची मुंबईत बैठक होत आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019