शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

परमबीर सिंग यांनी स्वत:च्या बचावासाठी सनसनाटी निर्माण करण्यासाठी लेटरचा वापर केला : नवाब मलिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 18:10 IST

Maharashtra Minister Nawab Malik Criticize Former Commissioner police Mumbai Param bir Singh letter bomb Sachin Vaze and Anil Deshmukh 100 crore : महाराष्ट्रात आमदार फोडता येत नाही म्हणून त्यासाठी सरकारला बदनाम करुन केंद्राचा वापर करत हे सरकार बदलता येते का हा प्रयत्न भाजप करत असल्याचा मलिक यांचा आरोप

ठळक मुद्देआमदार फोडता येत नाही म्हणून बदनाम करून केंद्राचा वापर, मलिक यांचं वक्तव्यपरमबीर सिंग यांचे आरोप स्वतःला वाचवण्यासाठी निर्माण केलेले, मलिक यांचं वक्तव्य

"परमबीर सिंग टीआरपी घोटाळ्याबाबतीत पुढे पुढे होते मात्र मागील दोन महिने ते गार पडले होते. त्यांच्यावर कोणता दबाव होता हे आम्हाला माहीत नाही. पण आजच्या घडीला परमबीर सिंग लेटर लिहितात तेव्हा लेटरमध्ये ते दोन मुद्दे उपस्थित करत आहेत. त्यामध्ये गृहमंत्र्यांनी टार्गेट दिले होते असा खोटा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी स्वतः पुरावे निर्माण करुन सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला," असे म्हणत नवाब मलिक यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. "दुसरा मुद्दा डेलकर आत्महत्या प्रकरणात गृहमंत्री भाजपच्या नेत्यांना फसवण्याचा प्रकार करा असा आदेश मला देत होते असे म्हटले आहे. यात स्पष्ट प्रश्न आहे मोहन डेलकर यांची आत्महत्या मुंबईमध्ये झाल्यानंतर गुन्हा मुंबईत होणार की दादरा नगर हवेलीमध्ये होणार याचं उत्तर जनतेला अपेक्षित आहे," असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. Maharashtra Minister Nawab Malik Criticize Former Commissioner police Mumbai Param bir Singh"परमबीर सिंग यांचे आरोप स्वतःला वाचवण्यासाठी निर्माण करण्यात आले आहेत. दोन - तीन दिवस फडणवीस माध्यमांशी संवाद साधून लोकांची दिशाभूल करत आहेत. ते स्पष्टपणे उघडे पडले आहेत. हिंदीमध्ये संवाद साधून फडणवीस यांनी सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. त्या पत्रकार परिषदेत रश्मी शुक्लांची बाजू ते मांडत होते. बेकायदेशीररित्या फोन टॅप करणे हा गुन्हा आहे. फडणवीस ज्या रिपोर्टचा संदर्भ देत होते. त्यामध्ये ८० टक्के पोलिसांची बदली झालेली नाही आणि ज्या रिपोर्टचा संदर्भ देत होते की, गृहमंत्री पैसे घेत होते परंतु गृहमंत्री ही नावे अंतिम करत नाही. अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतात त्याआधी ते निर्णय जस्टीफायसाठी गृहमंत्र्यांकडे येतो तो निर्णय करत असताना एसीएस होम, डीजी त्याकाळातील सुबोध जस्वाल या समितीमध्ये असताना त्यांनी ज्या शिफारशी केल्या त्यांच्या बदल्या झाल्या आहेत," असंही मलिक यांनी स्पष्ट केलं. 

खालच्या अधिकार्‍यांच्या बदल्यांची शिफारस पोलीस एस्टाब्लीशमेंट बोर्ड याचे अध्यक्ष ज्यांनी ही नोट पाठवली आहे, ते स्वतः त्याचे अध्यक्ष असताना जी नावे पाठवली त्या बदल्या झाल्या आहेत. फडणवीस यांना सत्तेशिवाय रहाता येत नाहीय असा थेट आरोपही त्यांनी केला आहे.आमदार फोडता येत नाही म्हणून बदनाम करून केंद्राचा वापरभाजपने या देशात कर्नाटकचे सरकार पाडले. उत्तराखंडमध्ये सरकार बदल केला. ईशान्य भारतात सरकार बदल केला. मध्यप्रदेशमध्ये सरकार बदलले. त्यांना महाराष्ट्रात आमदार फोडता येत नाही म्हणून त्यासाठी महाविकास आघाडी सरकारला बदनाम करुन केंद्राचा वापर करत हे सरकार बदलता येते का हा प्रयत्न भाजप करत आहे. परंतु आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे त्यामुळे कुठलंही सरकार बहुमतात आहे तोपर्यंत सत्तेपासून कुणी दूर करु शकत नाही. जोपर्यंत सरकार फ्लोअर वर बहुमत सिद्ध करु शकत नाही तोपर्यंत कुठलंही सरकार सत्तेपासून दूर करता येत नाही. ते अधिकार राज्यपाल किंवा केंद्र सरकारला नसल्याचेही मलिक म्हणाले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रnawab malikनवाब मलिकParam Bir Singhपरम बीर सिंगAnil Deshmukhअनिल देशमुखsachin Vazeसचिन वाझे