शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

CM Uddhav Thackeray on Coronavirus: विरोधक किंवा तज्ज्ञांचा दु:स्वास करण्यापेक्षा...; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना प्रतिटोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 23:17 IST

Devendra Fadnavis slams CM Uddhav Thackeray on Lockdown, Corona Virus : देवेंद्र फडणवीस यांनी विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही, तर आपण प्रत्यक्ष काय करतो, याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल, असे सांगत उद्धव ठाकरे यांना प्रतिटोला लगावला आहे.

ठळक मुद्देराज्यात लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या आणि लॉकडाऊन केलं तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देणाऱ्यांवर निशाणा साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जगातील परिस्थितीची आढावा वाचून दाखवला. 

मुंबई : मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच, राज्यात लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या आणि लॉकडाऊन केलं तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देणाऱ्यांवर निशाणा साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जगातील परिस्थितीची आढावा वाचून दाखवला.  यावरून भाजपाचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही, तर आपण प्रत्यक्ष काय करतो, याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल, असे सांगत उद्धव ठाकरे यांना प्रतिटोला लगावला आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुकद्वारे पोस्ट केली आहे. (Maharashtra Lockdown : Devendra Fadnavis slams CM Uddhav Thackeray on Lockdown, Corona Virus)

देवेंद्र फडणवीस यांची फेसबुक पोस्ट :-"फ्रान्सने तिसर्‍यांदा लॉकडाऊन लावला...पण, 120 अब्ज डॉलर्सचे विविध उपाय हाती घेतले...हंगेरीत ‘वर्क फ्रॉम होम’...पण, युरोपियन युनियनमध्ये भांडून हक्काचा निधी पदरी पाडून घेतला...डेन्मार्कमध्येही तीच परिस्थिती...पण, एप्रिल 2020 मध्येच सर्वच घटकांना पॅकेज...ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध उठण्यास मदत...पण, 2,20,000 उद्योग आणि 6 लाखांवर कर्मचार्‍यांना मदतएवढेच नाही तर वेतन न मिळणार्‍यांना 800 युरोंपर्यंत मदत !बेल्जियमने परत लॉकडाऊन केलाय...पण, 20 बिलियन युरोचे पॅकेज जाहीर केलंय...पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे...पण, 13 बिलियन युरोचे पॅकेज मार्च 2020 मध्येच जाहीर केले...आयर्लंडमध्ये डिसेंबरपासून कडक निर्बंध आहेत...पण, 7.4 बिलियन युरोंचे पॅकेज ऑक्टोबरमध्येच दिलंय...फिलिपाईन्समध्ये कडक निर्बंध आहेत...पण, 3.4 बिलियन डॉलर्सचे पॅकेज सप्टेंबरमध्येच दिलंय...युके,जर्मनी कुठेही जा,सर्वांनीच काही ना काही दिलंय...तुलना केवळ परिस्थितीशी नको,सरकारच्या कृतीशीही व्हावी,एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा!विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही, तर आपण प्रत्यक्ष काय करतो, याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल.होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत...आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची..."

जगाची माहिती देऊन विरोधकांच्या आरोपांची हवाच काढलीराज्यात लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या आणि लॉकडाऊन केलं तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देणाऱ्यांसाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी जगातील परिस्थितीची माहिती वाचून दाखवली. ब्राझील, फ्रान्स, बल्गेरिया, रशिया मधल्या परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांनी देत तिथं लादण्यात आलेल्या कठोर निर्बंध आणि लॉकडाऊनबाबत सांगून विरोधकांवर निशाणा साधला.  "देशाबाहेर कोरोनाची स्थिती भयंकर होत चालली आहे. अनेक ठिकाणी आजही लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लादलेले आहेत. पण आपण राज्यातील जनतेचा आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचा विचार करुन अद्याप तरी लॉकडाऊन केलेला नाही. त्यामुळे विरोधकांनी कोरोनाचं राजकारण करू नये. उलट त्यांनी राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयांसाठी मदत करण्याची भूमिका घ्यावी", असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. 

(नुसते सल्ले देण्याचे 'उद्योग' नका करू, ५० डॉक्टर्स पण द्या; नाव न घेता उद्धव ठाकरेंचा आनंद महिंद्रांना टोला)

लॉकडाऊन नको मग पर्याय सुचवा"राज्यात आपण आरोग्य सुविधा वाढवत आहोत. आजच्या घडीला सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात होत आहेत आणि संख्या येत्याही काळात वाढवण्यात येणार आहे. पण आरोग्य सेवा वाढवा म्हणजे फक्त फर्निचर वाढवून चालत नाही. त्यासाठी लागणारे डॉक्टर, नर्सेस आणि तज्ज्ञ मंडळी कुठून आणणार?", असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित केला. 

(परदेशात कडक लॉकडाऊन, मात्र आपण कात्रीत सापडलोय - मुख्यंमत्री)

दोन दिवसांत कठोर नियमावली जाहीर करणारमुख्यमंत्र्यांनी यावेळी संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करत नसलो तरी इशारा देत आहे, असं सांगत येत्या दोन दिवसांत राज्यात नव्या निर्बंधांची नियमावली जाहीर करण्यात येईल, अशी माहिती दिली आहे. तसेच अशीच रुग्णवाढ सुरू राहिली तर येत्या १०-१५ दिवसांत राज्यातील उपलब्ध आरोग्य संसाधनं कमी पडू लागतील आणि कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा थेट निर्वाणीचा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी दिला आहे

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस