शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

"आमदारकी गेली तर चालेल, रस्त्यावर संघर्ष सुरूच राहील; निलंबन म्हणजे ठाकरे सरकारची हिटलरशाही"; भाजपाचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 16:29 IST

Maharashtra Legislative Assembly And BJP Ram Satpute : 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. याच दरम्यान भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

मुंबई - ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज विधानसभेत सुरू झालेल्या चर्चेचं पर्यवसान आधी शाब्दिक वादात, आरोप-प्रत्यारोपात, नंतर गदारोळात आणि पुढे अक्षरशः राड्यात झालं. शेवटी, तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपाच्या 12 आमदारांवर एक वर्षाच्या निलंबनाच्या कारवाई करण्यात आली. संजय कुटे, आशिष शेलार, गिरीश महाजन, पराग अळवणी, राम सातपुते, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, हरीश पिंपळे, योगेश सागर, नारायण कुचे, कीर्तीकुमार (बंटी) बागडिया, अभिमन्यू पवार या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. याच दरम्यान भाजपाने ठाकरे (Thackeray Government) सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"आमदारकी गेली तर चालेल; रस्त्यावर संघर्ष सुरूच राहील" असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाचे आमदार राम सातपुते (BJP Ram Satpute) यांनी "आम्ही शिवीगाळ केलेली नाही. एक कथा रचून आमचं निलंबन करण्यात आलं. पण ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आमचा संघर्ष सुरूच राहील. आमदारकी गेली तरी चालेल. पण जनतेच्या प्रश्नांसाठी लढतच राहणार. बारा आमदारांचं निलंबन म्हणजे ठाकरे सरकारची हिटलरशाही" असं म्हटलं आहे. तसेच सातपुते यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरूनही याबाबत ट्विट केलं आहे. "ओबीसी आरक्षणासाठी लढताना आमचे एक वर्षांसाठी निलंबन झाले... आम्ही सरकारच्या हिटलर प्रवृत्तीचा निषेध करतो" असं देखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

ओबीसी आरक्षणासाठी 12 काय 106 आमदारही पणाला लावू , अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन करण्याचा ठराव संमत झाला आहे. त्यानंतर, फडणवीसांनी भूमिका मांडली. शिवसेना आमदार आणि इकडच्या आमदारांमध्ये बाचाबाची झाली होती. आम्ही रागात होतो, अध्यक्ष महोदय हे जरुर खरं आहे, तेथे बाचाबाची झाली. आम्ही त्याचठिकाणी आम्ही तुमची माफी मागितली. त्यामुळे, यासंदर्भात विरोधकांना बोलावून आमच्याशी चर्चा करायला हवी, जाणून बुजून विरोधकांच्या सदस्यांची संख्या कमी करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये, असंही फडणवीस म्हणाले आहेत. 

“सरकारच्या तोंडावर MPSC ची पुस्तकं फेकून मारतो मग कळेल”

राम सातपुते यांनी याआधी विधानभवन परिसरात आंदोलन करून सरकारचा जोरदार निषेध केला होता. राम सातपुते म्हणाले की, वरळी केम छो बोलणं सोप्पं आहे. पण विद्यार्थ्यांवर बोलायला वेळ नाही. हे सरकार निर्लजम्म सदासुखी आहे. MPSC विद्यार्थ्यांच्या मुलाखती झाल्यात त्यांना नियुक्त्या द्या. विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता नाही. यांना केवळ त्यांच्या लेकराबाळांची चिंता आहे. विद्यार्थ्यांची यांना काही देणं घेणं नाही. सरकारला फक्त वसुली चालली पाहिजे. वाझेसारखे अधिकारी जगले पाहिजेत, विद्यार्थी मेले पाहिजेत, हे सरकार पळपुटे आहे. हेच त्यांचे धोरण आहे अशी टीका त्यांनी केली.

त्याचसोबत लाखो विद्यार्थ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. काहीतरी नाटकं करून विलंब करत आहे. पार्थ पवार, रोहित पवार, आदित्य ठाकरे यांची चिंता सरकारला आहे. 2 दिवसांचे अधिवेशन घेतले. सरकार तोंडावर पुस्तक मारायला आणली आहेत. ठाकरे सरकारनं विद्यार्थ्यांचे वाटोळे केले आहेत. विद्यार्थी आत्महत्या करतंय पण सरकार गप्प बसलंय. विद्यार्थी दिवसभर राबराब करतात. स्वप्निलची आत्महत्या नसून सरकारच्या कुचकामी धोरणानं केलेली हत्या आहे. 413 विद्यार्थी MPSC परीक्षा पास होऊन नियुक्त्या नाहीत. स्वत:ची लेकरंबाळं आमदार, खासदार झाली पाहिजेत मग महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचे काय? असा सवाल आमदार राम सातपुते यांनी विचारला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र