शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

Maharashtra Gram Panchayat: पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का; कराड-शेनोली शेरेगावात भाजपचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 9:50 AM

Gram Panchayat Election Result: राज्यातील ३४ जिल्ह्यांतील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल सोमवारी लागणार असून गावचे कारभारी कोण असणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. हिला निकाल जाहीर करण्याचा मान हा कोल्हापूरला मिळाला आहे. 

कराड : ग्राम पंचायत निवडणुक ही मोठमोठ्या नेत्यांसाठी खूप महत्वाची आहे. हे नेते जरी थेट निवडणुकीत उतरलेले नसले तरीही त्यांची पॅनेल ही जिल्ह्यात वर्चस्व कोणाचे हे ठरविणार आहेत. अशातच कराडमधून एक मोठी बातमी येत आहे. 

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांना भाजपाने जोरदार धक्का दिला आहे. शेनोली शेरेगावात भाजपाने विजय मिळविला आहे. राज्यातील विविध भागातील ग्राम पंचायतींचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. पहिला निकाल जाहीर करण्याचा मान हा कोल्हापूरला मिळाला आहे. 

फलटण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतील कोळकी गावचा निकाल नुकताच जाहीर झाला असून अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत. कोळकीच्या निवडणुकीत माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वत: लक्ष घातले होते. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी पॅनल उभे केले होते मात्र असे असताना देखील भाजप पुरस्कृत श्रीराम पॅनेलच्या एकाही उमेदवाराचा विजय झाला नाही. या ठिकाणी भाजपची सपशेल हार झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजे गटाच्या उमेदवारांना जरी यश आले असले तरी अनेक ठिकाणी बंडखोर उमेदवार विजयी झाले आहेत.

बिनविरोधमध्ये सरशी कोणाची? राज्यातील ३४ जिल्ह्यांतील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल सोमवारी लागणार असून गावचे कारभारी कोण असणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. यातच राज्यातील बिनविरोध झालेल्या ग्रा. पं.तींची आकडेवारीही लक्षनिय आहे. बिनविरोधच्या आकडेवारीत शिवसेनेने भाजपाला मागे टाकले आहे. यामुळे आजचे सर्व ग्राम पंचायतींचे निकाल सारे चित्र स्पष्ट करणार आहेत. 

 अनेकांनी ग्राम पंचायत बिनविरोध केल्यास अमूक एवढा निधी देऊ वगैरे आश्वासने दिली होती. यामुळे राज्यातील बिनविरोध झालेल्या ग्रा.पंचायतींची आकडेवारीही मोठी आहे. यामध्ये स्थानिक आघाड्यांनी बाजी मारलेली असली तरीही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा या पक्षांच्या ताब्यात किती बिनविरोध ग्रामपंचायती गेल्या हे पाहणे औत्सुक्याचे आहे. स्थानिक आघाड्यांना 520 ग्राम पंचायती बिनविरोध करता आल्या आहेत. तर विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून एकमेकांचे वैरी बनलेल्या शिवसेना भाजपामध्ये खरी चुरस आहे. मोठा कोण हे दाखविण्याचा प्रयत्न या निवडणुकीत केला जाणार आहे. तुर्तास शिवसेनेकडे जास्त ग्राम पंचायती आहेत. शिवसेनेकडे २७८ तर भाजपाकडे २५७ ग्राम पंचायती आल्या आहेत. यापाठोपाठ राष्टवादीकडे २१८ ग्रामपंचायती तर काँग्रेसकडे १२४ ग्राम पंचायती आल्या आहेत. मनसेकडे ५ ग्राम पंचायती आहेत. 

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा