शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

Maharashtra Budget Session: धमक्या देता का? माझी चौकशी करा! फडणवीस संतापले; देशमुख, पटोलेंना एकटे भिडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 14:54 IST

Maharashtra Budget Session: BJP leader Devendra Fadnavis question state government over Mansukh Hiren Death Case - मनुसख हिरेन प्रकरणावरून विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली

मुंबई: मनसुख हिरेन (Mansukh Hiren Death Case) यांच्या हत्येवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Leader Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत अतिशय आक्रमक पवित्रा घेतला. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाची माहिती देताना दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर (MP Mohan Delkar) यांच्या आत्महत्येची एसआयटी चौकशी करणार असल्याची घोषणा केली. यावेळी फडणवीस यांनी हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. त्यावरून अनिल देशमुख आणि नाना पटोले यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं.मोहन डेलकर पाचवेळा दादरा नगर हवेलीचे खासदार राहिले. त्यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केल्या. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांचं नाव आहे. मी मुंबईत आत्महत्या करत आहे. कारण मला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, असं डेलकर यांनी चिठ्ठीत लिहिलं आहे, अशी माहिती अनिल देशमुख यांनी सभागृहाला दिली."मनसूख हिरेन यांचा खून झाला असावा, तो सचिन वाझेंनी केला असावा", सभागृहात गंभीर आरोपअनिल देशमुख यांनी डेलकर प्रकरणाची माहिती देत असताना देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन प्रकरण उपस्थित केलं. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याविरोधात इतके पुरावे असताना त्यांना का पाठिशी घातलं जातंय? सरकार त्यांचा वाचवण्याचा प्रयत्न का करतंय?, असे प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केले. सचिन वाझे यांचं निलंबन झालं असताना त्यांनी एका पक्षात प्रवेश केला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्यांचं निलंबन मागे घेण्यात आलं, असं म्हणत फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला लक्ष्य केलं.भाजप आमदारांच्या घोषणा अन् बारामती कनेक्शन; फडणवीसांना हसू अनावरपोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याशी संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं त्यावर भाष्य करणं योग्य नाही, असं देशमुख म्हणाले. त्यावर हे प्रकरण न्यायालयात गेलं असलं तरीही ते सुनावणीसाठी आलेलं नाही, असं प्रत्युत्तर देत फडणवीस यांनी देशमुखांचा मुद्दा खोडून काढला. यावर केंद्र, राज्याची सुरक्षा यंत्रणा असताना मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं असलेली कार पोहोचलीच कशी, असा प्रश्न काँग्रेस नेते नाना पटोलेंनी उपस्थित केला.चोख सुरक्षा व्यवस्था असताना अंबानींच्या घराबाहेर पोहोचतेच कशी, या प्रकरणातले सीडीआर बाहेर कसे येतात, असे सवाल पटोलेंनी उपस्थित केले. याची चौकशी व्हायला हवी, असं पटोले म्हणाले. त्यावर मी मिळवले सीडीआर. माझी चौकशी करा. चौकशीच्या धमक्या कुणाला देता? असं म्हणत फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला. माझी चौकशी करा. पण त्याआधी खुन्याला अटक करा, असं फडणवीस म्हणाले. यावेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडलं.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNana Patoleनाना पटोलेAnil Deshmukhअनिल देशमुखMansukh Hirenमनसुख हिरण