शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीसमोर मताधिक्य राखण्याचे आव्हान, मविआची 'या' 11 मतदारसंघात काय होती स्थिती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 18:34 IST

Maharashtra Assembly election 2024 Jalgaon: जळगाव जिल्ह्यात विधानसभेच्या ११ जागा आहेत. सलग तीन लोकसभा निवडणुकीत युतीने या मतदारसंघात वर्चस्व राखले आहे, पण यावेळी विधानसभा निवडणुकीत या ११ मतदारसंघाचा निकाल काय असणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. 

अजय पाटील, जळगाव Maharashtra Assembly election 2024: विधानसभेच्या तब्बल ११ जागा असलेल्या जळगाव जिल्ह्यातील राजकारणाकडे सगळ्याचे लक्ष आहे. एकनाथ खडसे यांच्यानंतर गिरीश महाजन यांनी जिल्ह्यात भाजप मजबूत केली असून, गेल्या तीन लोकसभा निवडणुकीत त्यांची प्रचिती निकालाच्या माध्यमातून आली आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीतही महायुतीने या ११ विधानसभा मतदारसंघात लाखांच्या वर मताधिक्य घेतले. महाविकास आघाडीची कामगिरी जेमतेम राहिली. त्यामुळेच यावेळी या ११ मतदारसंघात महायुतीला मताधिक्य कायम ठेवण्याचे, तर महाविकास आघाडीसमोर ते मताधिक्य पार करण्याचे आव्हान आहे.  

काही महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या दोन्ही उमेदवारांना जिल्ह्यातील सर्व ११ विधानसभा मतदारसंघात मोठे मताधिक्य मिळाले होते.

लोकसभेला मताधिक्य विधानसभेला वेगळे चित्र

त्याच्याआधी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळीसुध्दा जळगाव व रावेर या दोन्ही मतदारसंघात भाजपचे उमेदवारच विजयी झाले होते. त्यावेळी चार महिन्यानंतरच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत रावेर, मुक्ताईनगर व अमळनेर या तीन मतदारसंघात मात्र महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. 

२०१४ मध्येदेखील लोकसभेच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांना सर्व ११ मतदारसंघांमध्ये मताधिक्य मिळाले होते. मात्र, त्यावेळच्या विधानसभेच्या निवडणुकीत चोपडा, जळगाव ग्रामीण, पाचोरा, एरंडोल, अमळनेर या मतदारसंघांमध्ये भाजपला लोकसभेचे मताधिक्य राखता आले नव्हते.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीला मोठे मताधिक्य मिळाले, ते महायुतीला कायम ठेवण्याचे आहे, तर महाविकास आघाडीला हे मताधिक्य कमी करण्याचे आव्हान आहे. 

स्मिता पाटील यांना अडीच लाखांचं मताधिक्य

जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपने उन्मेश पाटील यांचं तिकीट कापत स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने करण पाटील यांना उमेदवारी दिली होती. 

स्मिता वाघ यांना ६ लाख ७४ हजार ४२८ मते मिळाली होती. तर करण पाटील यांना ४ लाख २२ हजार ८३४ मते मिळाली होती. स्मिता वाघ यांचा २ लाख ५१ हजार ५९१ इतक्या मताधिक्याने विजय झाला होता. 

रक्षा खडसेंना अडीच लाखांहून अधिक मताधिक्य

जळगाव जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला होता. रक्षा खडसे यांनी  (६,३०,८७९ मते) श्रीराम पाटील (३,५८,६९६ मते) यांचा २ लाख ७२ हजार १८३ मतांनी पराभव केला होता. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकJalgaonजळगावMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी