शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

उद्धव ठाकरेंनी उमेदवार केला जाहीर; महाविकास आघाडीत बंडखोरीची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 20:44 IST

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने हर्षद कदम यांना शंभूराज देसाई यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे. 

नितीन काळेल, सातारा महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा पूर्णपणे सुटला नसतानाच उद्धवसेनेने पहिली यादी जाहीर करत पाटणमधून हर्षद कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे पाटणमध्ये आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. कारण, राष्ट्रवादी अर्थात पाटणकर गट निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

विधानसभेची निवडणूक जाहीर होऊन आठ दिवस झाले आहेत. तरीही महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा पूर्णपणे सुटलेला नाही. दररोजच नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यामुळे कोणते मतदारसंघ कोणत्या पक्षाच्या वाट्याला गेले आहेत हे पूर्णपणे स्पष्ट नाही.

वरिष्ठ स्तरावर जागा वाटपावरून चर्चा सुरूच आहे. अशातच उद्धवसेनेने बुधवारी सायंकाळी आपली पहिली ६५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील पाटण मतदारसंघासाठी हर्षद कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. पण, मुळातच पूर्वीच्या आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवत आलेला आहे.

याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची अर्थात पाटणकर गटाची ताकद मोठी आहे. त्यातच येथे पक्षापेक्षा गटातच निवडणूक होते. अशातच उद्धवसेनेने उमेदवार जाहीर केल्याने पाटणकर गट शांत बसेल, अशी चिन्हे नाहीत. त्यामुळे आघाडीत बंडखोरी होऊ शकते. तसेच सत्यजितसिंह पाटणकर हे अपक्ष लढू शकतात. त्यामुळे पाटणमध्ये तिरंगी लढत होण्याची अधिक शक्यता आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीचीही यादी येणार...

आघाडीत उद्धवसेनेने पहिल्यांदा यादी जाहीर केली. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीची यादी जाहीर होईल. पण, सातारा जिल्ह्यात आठ मतदारसंघ आहेत. त्यातील कोणाच्या वाट्याला किती गेलेत हेच स्पष्ट नाही. त्यातच उद्धवसेना दोन मतदारसंघासाठी आग्रही आहे.

काँग्रेसलाही दोन मतदारसंघ हवेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला फक्त चार मतदारसंघच राहतात. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा सुटल्यानंतरच कोणाकडे किती मतदारसंघ राहणार, हे स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरे