शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 19:30 IST

Maharashtra Vidhan Sabha 2024: विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली. पहिल्या दोन दिवसांत अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या कमी होती. पण, गुरूवारी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले. 

नितीन काळेलसातारा : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखलच्या तिसऱ्या दिवशी १७ उमेदवारांनी २० उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये कोरेगाव मतदारसंघातून आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि कऱ्हाड दक्षिणमधून भाजपकडून डॉ. अतुल भोसले यांनी अर्ज दाखल केला आहे. तर पाटण, कऱ्हाड उत्तर, फलटण आणि वाई मतदारसंघासाठी गुरुवारी कोणीही अर्ज दाखल केलेला नाही.

विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली. पहिल्या दोन दिवसांत अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या कमी होती. पण, गुरूवारी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले. 

विधानसभेच्या आठ मतदारसंघासाठी १७ उमेदवारांची २० नामनिर्देशनपत्रे दाखल झाली. माण मतदारसंघातून दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले. कऱ्हाड दक्षिणसाठी ६ उमेदवारांची ८ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली. तसेच सातारा विधानसभा निवडणुकीसाठी दोघांनी अर्ज दाखल केला आहे. कोरेगाव मतदारसंघासाठी ७ उमेदवारांची ८ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत.

माण विधानसभा मतदारसंघातून संदिप जनार्दन खरात आणि शिवाजीराव शामराव मोरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. कऱ्हाड दक्षिणसाठी भाजपकडून डॉ. अतुल भोसले आणि डॉ. सुरेश भोसले यांनी उमेदवारी दाखल केली. 

तसेच याच मतदारसंघात अपक्ष म्हणून गोरख गणपती शिंदे, विश्वजीत अशोक पाटील, इंद्रजित अशोक गुजर, रविंद्र वसंतराव यादव यांनी अर्ज भरला आहे.

सातारा मतदारसंघासाठी वसंतराव मानकुमरे आणि राजेंद्र निवृत्ती कांबळे या दोघांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात जालिंदर शंकर गोडसे यांनी शिवसेना आणि अपक्ष म्हणून दोन अर्ज दाखल केले. 

तसेच आमदार शशिकांत शिंदे आणि त्यांची पत्नी वैशाली शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे. तसेच अपक्ष म्हणून उद्धव आत्माराम कर्णे, ॲड. संतोष गणपत कमाने, सचिन सुभाष महाजन, उमेश भाऊ चव्हाण यांनी अर्ज भरला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024koregaon-acकोरेगावShashikant Shindeशशिकांत शिंदे