Video : नितीन गडकरी सुषमा स्वराज यांचा आशीर्वाद घेतात तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 13:08 IST2019-03-26T12:53:46+5:302019-03-26T13:08:09+5:30
राजकारणात कधीच कोणी कोणाचं कायमचं शत्रू नसतं, तर कधीच कोण मित्रही राहत नाही.

Video : नितीन गडकरी सुषमा स्वराज यांचा आशीर्वाद घेतात तेव्हा...
नवी दिल्ली- राजकारणात कधीच कोणी कोणाचं कायमचं शत्रू नसतं, तर कधीच कोण मित्रही राहत नाही. बऱ्याच पक्षांमध्ये अंतर्गत कुरघोडी दिसून येतात. परंतु भाजपामधल्या सुषमा स्वराज आणि नितीन गडकरींनी अनोखं उदाहरण समोर ठेवलं आहे. भाजपाच्या दिल्लीस्थित पार्टी मुख्यालयात सोमवारी वेगळंच चित्र पाहायला मिळालं. निवडणुकीसंदर्भात होणाऱ्या बैठकीसाठी सुषमा स्वराज आणि नितीन गडकरी दिल्लीस्थित मुख्यालयात पोहोचले आहेत.
याचदरम्यान दोन्ही नेत्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर दोन्ही नेत्यांचं युजर्सनं तोंडभरून कौतुक केलं आहे. खरं तर सोमवारी पार्टी मुख्यालयात सुषमा स्वराज पोहोचल्या, तेव्हा तिथे नितीन गडकरीही आले. गडकरी सुषमा स्वराज यांच्याजवळ आले आणि त्यांनी नतमस्तक होत त्यांना नमस्ते केले.
गडकरींहून जवळपास 6 वर्षं ज्येष्ठ असलेल्या सुषमा यांनी गडकरींच्या डोक्यावर हात फिरवत त्यांना आशीर्वाद दिले. सुषमा स्वराज यांनी गडकरींना विजयी भव असे आशीर्वाद दिल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय. विशेष म्हणजे नितीन गडकरींनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. सुषमा स्वराज तुमच्या आशीर्वादासाठी मी आभारी आहे, असंही नितीन गडकरी ट्विटरवरून म्हणाले आहेत.
Thank you @sushmaswaraj ji for your blessings and warm wishes. pic.twitter.com/wwQblvmjq8
— Chowkidar Nitin Gadkari (@nitin_gadkari) March 25, 2019