शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
5
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
6
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
7
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
8
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
9
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
10
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
13
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
14
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा
15
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
16
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
17
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
18
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
19
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

पंतप्रधान मोदींच्या विरोधात 'ते' नरेंद्र मोदी लढणार; वाराणसीत आव्हान देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 5:47 PM

वाराणसीत मोदींविरोधात तमिळनाडूचे 111 शेतकरी, उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मैदानात

वाराणसी: लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचारयंत्रणा कामाला लागल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाही वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढणार आहेत. 26 एप्रिलला ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मोदींविरोधात तमिळनाडूचे 111 शेतकरी, बीएसएफचे माजी जवान, उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती यांच्यासह अनेक जण निवडणुकीला उभे राहणार आहेत. याशिवाय मोदींसारखेच दिसणारे अभिनंदन पाठकदेखील वारासणीतून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अभिनंदन पाठक 26 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पाठक वाराणसीसोबतच लखनऊमधूनही निवडणूक लढवणार आहेत. भाजपा जुमल्यांसाठी ओळखली जाते, अशी टीका पाठक यांनी केली. 'भाजपानं लोकांना अच्छे दिन आणण्याचं स्वप्न दाखवलं होतं. प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये आणण्याचं वचन दिलं. मात्र आता ते आता आम्हाला पकोडे तळायला सांगतात. ते अली विरुद्ध बजरंगबलीचे मुद्दे उपस्थित करतात,' अशा शब्दांमध्ये पाठक यांनी भाजपाचा समाचार घेतला. मी जिंकण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचं पाठक यांनी सांगितलं. 'लोक पक्ष बाजूला ठेऊन मला मतदान करतील आणि भाजपाला उत्तर देतील,' असं पाठक म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपाच्या 'मैं भी चौकीदार' मोहिमेवर निशाणा साधला. जे लोक स्वत:ला चौकीदार म्हणवून घेतात. मात्र त्यांना गरिबी काय असते ते माहीत नाही, अशी टीका त्यांनी केली. ईश्वर आणि अल्ला एकच असल्याची प्रतिक्रिया त्यांनी अली आणि बजरंगबलीच्या मुद्द्यावर भाष्य करताना दिली. मला अली आणि बजरंगबली अशा दोघांचाही आशीर्वाद असल्याचं पाठक यांनी सांगितलं.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Uttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019varanasi-pcवाराणसीNarendra Modiनरेंद्र मोदी