शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

त्रिशंकू परिस्थितीसाठी विरोधक सज्ज; राष्ट्रपतींना पाठवणार पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 20:28 IST

कर्नाटकची पुनरावृत्ती करण्याचा विरोधकांचा प्रयत्न

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीचा निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. भाजपानं काल एनडीएतील घटक पक्षांना डिनर पार्टी दिल्यानंतर विरोधकांच्या हालचाली वाढल्या आहेत. भाजपा बहुमतापर्यंत न पोहोचल्यास आणि त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास राष्ट्रपतींना पत्र देण्याची योजना विरोधकांनी आखली आहे. गेल्या वर्षी कर्नाटकमध्ये यशस्वी झालेली रणनीती पुन्हा एकदा विरोधकांकडून वापरली जाण्याची शक्यता आहे. भाजपाला स्वबळावर सत्ता न मिळाल्यास विरोधी पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास बिगर भाजपा सरकार स्थापण्याचा दृष्टीनं विरोधकांची तयारी सुरू आहे. येत्या दोन दिवसात त्याबद्दल राष्ट्रपतींना तसं पत्र देण्याची योजना विरोधकांकडून आखण्यात आली आहे. यासाठी गेल्या आठवडाभरापासून विरोधकांचं बैठकांचं सत्र सुरू आहे. टीपीपीचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी विरोधी पक्षातील भेटीगाठी घेण्याचा सपाटा लावला आहे. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही फोनाफोनी सुरू आहे. त्याआधी गेल्याच आठवड्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला पक्षाचे खजिनदार अहमद पटेल आणि वरिष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालादिवशीची रणनीती या बैठकीत ठरवण्यात आली. या बैठकीतील चर्चेनंतर पक्षाच्या कायदेविषयक विभागानं एक मसुदा तयार केला. बिगर एनडीए सरकार स्थापन करण्यासाठी विविध पक्ष आपला पाठिंबा कसा देऊ शकतात, याची माहिती या मसुद्यात आहे. त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास आम्हाला बहुमत सिद्ध करण्याची संधी द्या, अशी मागणी राष्ट्रपतींकडे करण्यात येईल, असं काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यानं सांगितलं. एनडीए बहुमतापासून दूर राहिल्यास आम्ही कर्नाटक पॅटर्नची पुनरावृत्ती करू. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींच्या संमतीनं हा निर्णय घेतला जाईल, अशी माहितीदेखील या नेत्यानं दिली. कर्नाटकमध्ये गेल्या वर्षी विधानसभेची निवडणूक झाली. त्यात भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या. मात्र दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसनं तिसऱ्या क्रमांकावरील जनता दलाच्या (सेक्युलर) साथीनं सरकार स्थापन केलं.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेसBJPभाजपाSharad Pawarशरद पवारChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूNCPराष्ट्रवादी काँग्रेसKarnatakकर्नाटकSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी