शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
5
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
6
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
8
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
9
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
10
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
11
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
12
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
13
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
14
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
15
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
16
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
17
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
18
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
19
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
20
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

...तर निवडणूकच रद्द करा; एक्झिट पोलनंतर आपची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 16:43 IST

दिल्लीत आपला पराभव पत्करावा लागणार असल्याचा एक्झिट पोल्सचा अंदाज

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातलं मतदान संपताच एक्झिट पोल्सचे अंदाज समोर आले. जवळपास सर्वच एक्झिट पोल्सनी एनडीएला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवला. यानंतर आम आदमी पार्टीनं पुन्हा एकदा ईव्हीएमला लक्ष्य केलं. व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएममधील पडताळणी चुकल्यास निवडणूक रद्द करण्यात यावी, अशी मागणी आपचे राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांनी केली. दिल्लीमध्ये आपचं सरकार आहे. मात्र बहुतांश एक्झिट पोल्समध्ये दिल्लीत आपला एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. देशाच्या राजधानीत भाजपाला निर्विवाद यश मिळेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतर आपनं एक्झिट पोल्स आणि ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 'खरा खेळ ईव्हीएमच्या माध्यमातून खेळला जाणार का? पैसे घेऊन एक्झिट पोल केले जातात का? बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, पश्चिम बंगाल. या सगळ्याच राज्यांमध्ये भाजपा विजयी होणार, हे कसं शक्य आहे?'', असे प्रश्न सिंह यांनी ट्विटमधून उपस्थित केले आहेत.संजय सिंह यांनी ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षातील नेत्यांना आवाहन केलं आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीत चूक आढळल्यास सर्व विरोधी पक्षांनी निवडणूक रद्द करण्याची मागणी करावी, असं सिंह म्हणाले आहेत. काल सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर विविध वाहिन्यांनी त्यांचे एक्झिट पोल प्रसिद्ध केले. यातील बहुतांश एक्झिट पोल्सनी एनडीएला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवला आहे. दिल्लीत आपला भोपळाही फोडता येणार नाही, असा अंदाज बहुतांश एक्झिट पोल्समधून वर्तवण्यात आला आहे. तर काही एक्झिट पोल्समध्ये आपला दिल्लीत एक जागा मिळेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९VVPATव्हीव्हीपीएटीexit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीAAPआपBJPभाजपा