शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सोमय्यांना शिवसेनेचा विरोध नव्हता; संजय राऊत यांचा यू टर्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 20:40 IST

सोमय्यांची उमेदवारी भाजपचा अंतर्गत मुद्दा; राऊत यांचं घूमजाव

नाशिक- भाजपा खासदार किरीट सोमय्या यांना उमेदवारी देण्यास शिवसेनेचा विरोध नव्हता, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सोमय्या यांच्या उमेदवारीला शिवसेनेला विरोध होता. त्यामुळेच त्यांना भाजपानं उमेदवारी नाकारली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र सोमय्यांची उमेदवारी हा भाजपाचा अंतर्गत मुद्दा असल्याचं राऊत नाशिकमध्ये म्हणाले. विशेष म्हणजे राऊत यांनी वेळोवेळी सोमय्यांच्या उमेदवारीविरोधात भूमिका घेतली होती. राऊत यांचे बंधू आमदार सुनिल राऊत यांनी सोमय्यांविरोधात अपक्ष लढणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्याचंही संजय राऊत यांनीही समर्थन केलं होतं. किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध असल्याने भाजपनं त्यांना उमेदवारी नाकारल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. सोमय्या यांना उमेदवारी देण्यास शिवसेनेचा विरोध नव्हता. तो भाजपाचा अंतर्गत मुद्दा आहे, असं राऊत म्हणाले. सोमय्या यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचारात सहभागी होऊ नये, ही शिवसैनिकांची भावना असली तरी ती पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचंदेखील राऊत यांनी सांगितलं.संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिली जाऊ नये अशी भूमिका घेतली होती. 'सोमय्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांबद्दल ज्या प्रकारची वक्तव्यं केली, ती योग्य नव्हती. टीका करण्यास हरकत नाही, पण आपण कोणत्या भाषेचा वापर करता याचाही विचार करायला हवा होता. कोणत्या मर्यादेपर्यंत टीका करावी हे आधीच ठरवलं पाहिजे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना  त्यांनी भरपूर त्रास दिला. आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना शांत केलं आहे. आता जो निर्णय घ्यायचा आहे तो भाजपाचे दिल्लीतील नेते घेतील,' असं संजय राऊत यांनी 29 मार्च रोजी म्हटलं होतं.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSanjay Rautसंजय राऊतKirit Somaiyaकिरीट सोमय्याShiv SenaशिवसेनाBJPभाजपा