शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

देशद्रोही नेत्यांच्या हातात सत्ता देणार का?; उद्धव ठाकरेंचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 22:01 IST

खामगावमधील सभेत राहुल गांधी, शरद पवारांवर शरसंधान 

खामगाव : पुलवामा हल्ल्यानंतर सैनिकांच्या शौर्यावर अविश्वास दाखवत मोदींजींना टार्गेट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशद्रोही नेत्यांच्या हाताता सत्ता देणार काय?  असा सवाल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना, भाजप युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ खामगावमध्ये आयोजीत सभेत ते बोलत होते. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टिका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, हा जाहीरनामा फसवा आहे. आम्ही ३७० कलम काढणार नाही अशी भाषा बोलली जात आहे. तर शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेतासुद्धा त्यांच्या जाहीरनाम्याला पाठिंबा देत आहे. हा देशद्रोह नाही का, याचा जनेतेने विचार करावा. मोदी हे दूरदृष्टी असणारे देशभक्त नेते आहेत. मोदींच्या मजबूत हातात आपला देश देण्याची गरज आहे. पाकड्यांना धडा शिकवायचा असेल तर मोदींना पुन्हा पंतप्रधान म्हणून निवडून द्यावेच लागेल. नाहीतर या देशाचे वाटोळे करण्याचे आघाडी सरकारचे स्वप्न पूर्ण होण्याची भिती आहे.देशद्रोह्यांना फासावर लटकवणारं सरकार हवं असेल, तर महायुतीला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. विदर्भासह राज्यात सर्वच ठिकाणी युतीचे उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होणार आहेत. भारताला इटली समजण्याचा प्रयत्न करू नका. कन्हैया, दाऊद सारख्यांना वाचवण्यासाठी राहुल गांधीना देशद्रोहाचा कायदा रद्द करायचा आहे.  हे प्रत्येकाने समजून घेण्याची गरज आहे. राममंदिर बांधण्याचे स्वप्न आम्ही निश्चित पूर्ण करू. पण त्याला विरोध करणाऱ्यांना या निवडणुकीत धडा शिकवण्याची गरज असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019buldhanaबुलडाणाUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीShiv SenaशिवसेनाRahul Gandhiराहुल गांधीSharad Pawarशरद पवारseditionदेशद्रोहkanhaiya kumarकन्हैय्या कुमारDawood Ibrahimदाऊद इब्राहिमRam Mandirराम मंदिर