शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

'न्याय' देण्यासाठी 72 हजार आणणार कुठून?; राहुल गांधींनी दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 13:09 IST

न्याय योजनेबद्दल विद्यार्थ्यानं विचारलेल्या प्रश्नाला राहुल गांधींचं उत्तर

पुणे: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी तरुण मतदारांशी संवाद साधला. यावेळी राहुल यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वीच न्याय योजनेची घोषणा केली. मात्र त्यासाठी निधी कुठून आणणार, याचं उत्तर त्यावेळी राहुल यांनी दिलं नव्हतं. त्याबद्दल राहुल यांनी आज भाष्य केलं.आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबांना दर वर्षी 72 हजारांची रक्कम दिली जाईल, असं आश्वासन राहुल गांधींनी दिलं आहे. या योजनेसाठी पैसा कुठून आणणार, असा प्रश्न त्यांना एका विद्यार्थ्यानं विचारला. यावर आम्ही नीरव मोदी, अनिल अंबानी, मेहुल चोकसी आणि विजय माल्ल्याकडून पैसे आणून गरिबांना देऊ, असं उत्तर काँग्रेस अध्यक्षांनी दिलं. 'किमान मासिक उत्पन्न 12 हजारांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबांना वर्षाकाठी 72 हजारांची आर्थिक मदत दिली जाईल. याचा फायदा देशातील 20 टक्के जनतेला होईल,' असा दावा राहुल यांनी केला होता. या योजनेला काँग्रेसला न्याय (न्यूनतम आय योजना) असं नाव दिलं आहे.राहुल गांधींनी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना न्याय योजनेचा पुनरुच्चार केला. मात्र या योजनेसाठी पैसा कुठून आणला जाणार, हा प्रश्न अनुत्तरितच होता. आज विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं. 'नीरव मोदी, मेहुल चोकसी, अनिल अंबानी आणि विजय माल्ल्यासारख्या लोकांकडून पैसा घेऊन आम्ही तो लोकांना देऊ. त्यासाठी मध्यम वर्गावरील कराचा बोजा वाढवणार नाही,' असं राहुल म्हणाले. 'आम्ही या योजनेसाठी आवश्यक तो अभ्यास केलेला आहे. कुठून पैसा आणायचा, तो कोणाला द्यायचा, याचा अभ्यास करण्यात झालेला आहे. आधी प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवण्यात येईल. त्यानंतर देशभरात तिची अंमलबजावणी केली जाईल,' असं त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Rahul Gandhiराहुल गांधीNirav Modiनीरव मोदीVijay Mallyaविजय मल्ल्याAnil Ambaniअनिल अंबानीcongressकाँग्रेस