शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

ममता बॅनर्जी विकासाच्या मार्गातील स्पीड ब्रेकर; मोदींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 5:32 PM

पंतप्रधान मोदींचं ममता बॅनर्जींवर शरसंधान

सिलिगुडी: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केला. ममता बॅनर्जी राज्याच्या विकासातील स्पीड ब्रेकर असल्याची टीका मोदींनी केली. ममता बॅनर्जी राज्याच्या विकासात अडथळे आणत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. ते सिलिगुडीत एका जनसभेला संबोधित करत होते. 'ममता बॅनर्जी राज्याच्या विकासातील स्पीड ब्रेकर आहेत. मतं मिळवण्यासाठी काँग्रेस आणि ममता बॅनर्जींना गरिबी हवी. गरीब व्यक्ती जेव्हा आजारी असते, तेव्हा उपचार ही सर्वात मोठी समस्या असते. कारण त्यावर मोठी रक्कम खर्च होते. आमच्या सरकारनं गरिबांवर उपचार करता यावेत यासाठी आयुष्यमान भारत योजना सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत एका वर्षामागे 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र स्पीड ब्रेकर दीदींनी ही योजना पश्चिम बंगालमध्ये रोखून धरली आहे,' अशा शब्दांमध्ये मोदींनी ममता बॅनर्जींवर शरसंधान साधलं. ममता बॅनर्जींच्या सत्ताकाळात गुन्हेगारी वाढल्याचा आरोप त्यांनी केला. तृणमूलचे गुंड दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र आम्ही असताना ते यशस्वी होणार नाहीत, असं पंतप्रधान म्हणाले. ममता बॅनर्जींमुळे पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांपर्यंत केंद्र सरकारची मदत पोहोचत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. 'देशभरातील शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत मदत दिली जात आहे. मात्र दीदींनी यादेखील योजनेला ब्रेक लावला आहे,' अशी टीका त्यांनी मोदींवर केली. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगाल