शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा हात देशासोबत की देशद्रोह्यांसोबत?; पंतप्रधान मोदींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 13:00 IST

कलम 124-अ रद्द करण्याच्या आश्वासनावरुन काँग्रेसवर हल्लाबोल

इटानगर: सत्तेत आल्यास देशद्रोहाचं कलम रद्द करण्याचं आश्वासन देणाऱ्या काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निशाणा साधला आहे. देशातील फुटिरतावाद्यांना प्रोत्साहन देण्याचा काँग्रेसचा मानस आहे. तिरंगा जाळणाऱ्या, जय हिंदऐवजी भारत तेरे तुकडे होंगे अशा घोषणा देणाऱ्यांबद्दल काँग्रेसला सहानुभूती वाटते. त्यामुळेच काँग्रेसचा हात देशासोबत आहे की देशद्रोह्यांसोबत, असा प्रश्न विचारावासा वाटतो, असं मोदींनी म्हटलं. यावेळी त्यांना महाआघाडीच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्याचं आवाहन उपस्थितांना केलं. ते अरुणाचल प्रदेशात आयोजित करण्यात आलेल्या एका जनसभेत बोलत होते. काल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. सत्तेत आल्यास भारतीय दंड संहितेतलं देशद्रोहाचं कलम (124-अ) रद्द करण्याचं वचन काँग्रेसनं जाहीरनाम्यातून दिलं. त्यावरुन मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. 'आम्ही देशद्रोह्यांना कठोर शिक्षा देण्याची भूमिका मांडतो. मात्र काँग्रेसला हे कलमच रद्द करायचं आहे. त्यामुळे काँग्रेसचा हात नेमका कोणासोबत आहे? देशासोबत की देशद्रोह्यांसोबत?', असा सवाल मोदींनी विचारला. यावेळी मोदींनी गेल्या 5 वर्षांत झालेल्या विकासकामांची माहिती दिली. 'आम्ही गॅस देण्याचं आश्वासन दिलं नव्हतं. मात्र उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत 7 कोटींहून अधिक सिलिंडर दिले. आम्ही आरोग्या क्षेत्रासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या नव्हत्या. मात्र आयुष्यमान भारत योजना लागू केली. त्यातून गरिबांना मोफत उपचार मिळत आहेत,' असं मोदींनी म्हटलं. मी जे काम हाती घेतो, ते पूर्ण करतोच, असंदेखील पंतप्रधान म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर जोरदार टीका केली. काँग्रेसचा जाहीरनामा खोट्या आश्वासनांनी भरलेला आहे, असं मोदींनी म्हटलं. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीseditionदेशद्रोहcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी