शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सासऱ्याकडे पाहून मुलगी दिली जात नाही; मग मोदींकडे बघून भाजपाला मतं कशी द्यायची?- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 17:08 IST

शरद पवारांचा पुन्हा पंतप्रधान मोदींवर निशाणा

अहमदनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाहून मत द्या, असं म्हणून मतदान करण्याचं आवाहन करणाऱ्या भाजपा नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोला लगावला आहे. सासऱ्याकडे बघून मुलगी दिली जात नाही, मग मोदींकडे पाहून भाजपाला मतं कशी द्यायची, असा सवाल उपस्थित करत पवारांनी चिमटा काढला. ते अहमदनगरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारसभेत बोलत होते. 'उद्या जर मुलगी द्यायची असेल, तर सासऱ्याकडे पाहून मुलगी दिली जाते का? आपण आधी मुलगा कसा आहे ते बघतो. तो काम करणारा आहे का, निर्व्यसनी आहे की नाही ते बघतो. त्यानंतर मुलीला तुला हे स्थळ पसंत आहे का ते विचारतो. यानंतर आपण मुलीचं लग्न ठरवतो. पण भाजपावाले सगळ्या भाषणांमध्ये मोदींकडे पाहून आम्हाला मतं द्या सांगत आहेत. स्वत: काय केलं ते सांगायचं नाही. उमेदवार कसा आहे ते बघायचं नाही. फक्त मोदींकडे पाहून मतं मागायची भाजपा नेत्यांना सवय झाली आहे,' अशा शब्दांमध्ये शरद पवारांनी भाजपाला टोला लगावला.गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्यात वाकयुद्ध रंगलं आहे. मोदींनी पवार कुटुंबात सारंकाही आलबेल नसल्याचं म्हणत हल्लाबोल केला होता. त्याला मोदी एकटेच राहत असल्यानं त्यांना कुटुंबाचं मोल कसं माहीत असेल, असं म्हणत पवारांनी प्रत्युत्तर दिलं. नको त्या गोष्टीत नाक खुपसू नका, असा इशारादेखील पवारांनी दिला होता. माझ्या घरात मुलगी, पत्नी, नातेवाईक आहेत. आमचं मोदींसारखं नाही. त्यांच्या घरात कोणीच नाही. त्यामुळे त्यांना कुटुंब चालवण्याचा अनुभव नाही,' असं पवार म्हणाले होते. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेस