शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

जर गुजरातचा विकास झालाय, तर असंख्य गुजराती महाराष्ट्रात का येतात?- राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 21:28 IST

गुजरातच्या विकासाचं मॉडेल, बुलेट ट्रेनवरुन राज ठाकरे मोदींवर बरसले

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचा विकास झाला म्हणता मग गुजराती माणसं महाराष्ट्रात का येतात, असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरेंनी उपस्थित केला. मोदींनी 2014 मध्ये देशाला गुजरात मॉडेल दाखवलं. गुजरातमधला विकास दाखवला. गुजरातचा इतकाच विकास झाला असेल, तर मग तिथली असंख्य गुजराती माणसं मुंबईत कशासाठी येतात?, असा प्रश्न राज यांनी विचारला. ते पुण्यातल्या सभेत बोलत होते. देशानं अनेक पंतप्रधान पाहिले. मात्र बाहेरच्या देशातील पंतप्रधानांना, अध्यक्षांना स्वत:च्या राज्यात नेणारा पंतप्रधान देशानं पहिल्यांदा पाहिला, अशा शब्दांमध्ये राज ठाकरे पंतप्रधान मोदींवर बरसले. भारतभेटीवर आलेल्या प्रत्येक अध्यक्षांना, पंतप्रधानांना मोदी फक्त आणि फक्त गुजरातमध्ये का नेतात, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडूत का नेत नाहीत, असे प्रश्न राज यांनी विचारले. मोदी जगभर फिरले. इतक्या देशांना भेटी दिल्या. त्यातून किती गुंतवणूक आणली, याची आकडेवारी त्यांनी द्यावी, असं आव्हान राज यांनी दिलं.गुजरातचा विकास आणि बुलेट ट्रेनवरुनदेखील राज ठाकरेंनी मोदींवर शरसंधान साधलं. यावेळी राज यांनी मोदींचा एक व्हिडीओदेखील दाखवला. 'मुंबई आर्थिक राजधानी आहे. गुजरात व्यापार केंद्र आहे. त्यामुळे इथून व्यवसाय जाणार असेल तर तो गुजरातला जाईल. पुण्याला जाणार नाही. कारण लक्ष्मी आणि सरस्वती वेगळ्या आहेत,' असं त्या व्हिडीओत मोदी म्हणाले होते. यावर बोलताना मराठी माणसानं त्या बुलेट ट्रेनचं करायचं काय, मराठी माणसाला बुलेट ट्रेनचा काय उपयोग, असे प्रश्न राज यांनी विचारले.मोदी गुजरातचा विकास केल्याचा दावा करतात. मग गुजरातमधील असंख्य माणसं मुंबईत का येतात, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात उद्योग संस्कृती रुजली आहे. इथलं वातावरण त्यासाठी अनुकूल आहे, असा विश्वास गुजराती माणसांना वाटतो म्हणून ते इथे येतात, असं म्हणत राज यांनी मोदींच्या गुजरातच्या मॉडेलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019pune-pcपुणेRaj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरात