शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Video: तुम्हाला २००० रुपये मिळाले ना?; शेतकरी एकसुरात 'नाही' म्हणाले अन् राजनाथ गप्पच झाले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 16:42 IST

शेतकऱ्यांच्या प्रतिसादानं राजनाथ सिंह यांची कोंडी

पाटणा: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बिहारच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांना नाचक्कीचा सामना करावा. पूर्णियात एनडीए उमेदवाराच्या प्रचारासाठी गेलेले राजनाथ सिंह शेतकऱ्यांना संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेच्या अंतर्गत तुमच्या खात्यात 2 हजार रुपये मिळाले का, असा प्रश्न विचारला. यानंतर शेतकऱ्यांनी दिलेल्या प्रतिसादानंतर राजनाथ सिंह यांना चांगलीच नाचक्की सहन करावी लागली.पूर्णियाच्या धमदहा उच्च विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेला काल (10 एप्रिलला) राजनाथ सिंह संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या योजनांचा पाढा वाचून दाखवला. आयुष्यमान भारत, कृषी सन्मान योजनेबद्दल ते बोलत होते. शेतकऱ्यांना वर्षाकाठी मिळणाऱ्या 6 हजारांच्या मदतीबद्दल राजनाथ सिंह भरभरुन बोलले. तुम्हाला आता 2000 रुपयांचा पहिला हफ्ता मिळाला का, असा प्रश्न सिंह यांनी विचारला. त्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी एका सूरात नाही असं उत्तर दिलं.शेतकऱ्यांनी दिलेल्या या प्रतिसादामुळे राजनाथ सिंह यांची चांगलीच कोंडी झाली. यानंतर त्यांनी कोणाच्या खात्यात तरी रक्कम झाली असेल ना?, असा प्रश्न केला. तेव्हा शेतकऱ्यांकडून प्रतिसादच आला नाही. त्यावर असं कसं होऊ शकतं? कोणाला तरी लाभ मिळाला असेल? ज्यांना मिळाला, त्यांना आपले हात वर करा. ज्यांना लाभ मिळाला, त्यांनीच आपले हात वर करावेत, असं राजनाथ सिंह म्हणाले. एकाही शेतकऱ्यानं हात वर केला नाही. त्यानंतर राजनाथ यांनी मंचावर बसलेल्या नेत्यांना योजनेचा लाभ का मिळाला नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. या संपूर्ण प्रकारामुळे राजनाथ यांची चांगलीच कोंडी झाली. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक 2019Rajnath Singhराजनाथ सिंहBJPभाजपाPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना