शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी कॅमेरे लावलेत, भाजपाला मत न दिल्यास काम मिळणार नाही; भाजपा आमदाराची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 15:43 IST

नेत्यांकडून आचारसंहितेचा भंग सुरूच

गांधीनगर: वादग्रस्त विधानांवरुन निवडणूक आयोग कारवाई करत असतानाही वाचाळवीर नेते तोंडाला लगाम घालताना दिसत नाहीत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बसपाच्या सर्वेसर्वा मायावती, समाजपाटी पार्टीचे नेते आझम खान, भाजपाच्या खासदार मेनका गांधी यांच्यावर आयोगानं कारवाई केली आहे. मात्र तरीही प्रचारादरम्यान नेते मंडळी आचारसंहितेचं सर्रास उल्लंघन करत आहेत. गुजरातमधल्या दाहोदमध्येभाजपाचे आमदार रमेश कटारा यांनी जनसभेला संबोधित करताना उपस्थितांना थेट धमकीच दिली.'ईव्हीएमवर जसवंत भाभोर (दाहोद लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार) यांचा फोटो असेल. त्यासमोर कमळाचं चिन्ह असेल. ते पाहूनच बटण दाबा. कोणतीही चूक होऊ देऊ नका. कारण यावेळी मोदी साहेबांनी मतदान केंद्रांवर कॅमेरे लावले आहेत. तुम्ही भाजपाच्या ऐवजी काँग्रेस उमेदवाराला मतदान केल्यास ते कॅमेऱ्यात दिसेल आणि कोण कोण काँग्रेसी आहे ते कळेल. मोदी साहेब तुमचा फोटो पाहतील आणि मग तुम्हाला काम मिळणं बंद होईल,' असा धमकीवजा इशाराच त्यांनी दिला. कटारा हे गुजरातच्या विधानसभेत फतेहपुरा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. सर्वोच्च न्यायालयानं वाचाळ नेत्यांवर कारवाई होत नसल्यानं निवडणूक आयोगाला धारेवर धरलं. त्यानंतर निवडणूक आयोगानं वाचाळवीरांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. वादग्रस्त विधानं केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, समाजपाटी पार्टीचे नेते आझम खान यांना 72 तास प्रचारापासून लांब राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर बसपाच्या सर्वेसर्वा मायावती, भाजपाच्या खासदार मेनका गांधी यांना 48 तास प्रचार न करण्याचे आदेश दिले आहेत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकGujarat Lok Sabha Election 2019गुजरात लोकसभा निवडणूक 2019dahod-pcदाहोदBJPभाजपाMLAआमदारyogi adityanathयोगी आदित्यनाथmayawatiमायावती