शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

अब की बार किसकी सरकार? दिल्लीतला 'हा' मतदारसंघ ठरवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 14:07 IST

मतदारसंघात तीन पक्षांमध्ये टक्कर

नवी दिल्ली: दिल्लीतल्या चांदनी चौक मतदारसंघाला देशाचा मूड अतिशय उत्तमपणे समजतो असं मानलं जातं. गेल्या 15 लोकसभा निवडणुकांचा विचार केल्यास बहुतांश वेळा चांदनी चौकमध्ये जिंकणाऱ्या पक्षानंच केंद्रात सत्ता स्थापन केली आहे. इतिहासावर नजर टाकल्यास केवळ दोनवेळाच चांदनी चौकवासीयांचा अंदाज चुकला आहे. यंदा चांदनी चौकमध्ये तिहेरी लढत आहे. या ठिकाणी आम आदमा पार्टी, काँग्रेस आणि भाजपामध्ये कडवी टक्कर पाहायला मिळत आहे. चांदनी चौक दिल्लीतला सर्वात लहान मतदारसंघ आहे. या ठिकाणी 15 लाख 61 हजार 828 मतदार आहेत. या मतदारसंघात भाजपाकडून डॉ. हर्षवर्धन, काँग्रेसकडून जयप्रकाश अग्रवाल आणि आपकडून पंकज गुप्ता मैदानात आहेत. चांदनी चौकचा निवडणूक इतिहास मोठा रंजक आहे. या मतदारसंघातून 9 वेळा काँग्रेसचे, 4 वेळा भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर प्रत्येकी एक-एकदा जनसंघ आणि जनता पार्टीचे उमेदवार विजयी झाले आहेत. चांदनी चौक मतदारसंघ 1956 मध्ये अस्तित्वात आला. 1957 मध्ये मतदारसंघात पहिल्यांदा निवडणूक झाली. यावेळी चांदनी चौकवासीयांनी देशातील मतदारांची नस अचूक ओळखली. त्यावेळी काँग्रेसचे राधा रमन या मतदारसंघातून विजयी झाले होते आणि देशातही काँग्रेसचं सरकार आलं. 2014 मध्ये देशात मोदी सरकार आलं. त्यावेळी या मतदारसंघातून भाजपाचे डॉ. हर्षवर्धन विजयी झाले. त्यामुळे यंदा चांदनी चौक कोणाला कौल देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकDelhi Lok Sabha Election 2019दिल्ली लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेसAAPआप