शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बसपाची बँकेतील 'माया' पाहून डोळे दीपतील; भाजपा, काँग्रेसपेक्षाही जास्त पैसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 13:33 IST

बसपाकडे भाजपापेक्षा आठपट बँक बॅलेन्स

नवी दिल्ली: देशभरात निवडणुकीचा जोर पाहायला मिळतो आहे. सात टप्प्यांमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. निवडणूक आली की बाजारात जास्त पैसा येतो. किंबहुना याच पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या जातात. ज्या उमेदवाराकडे जास्त पैसा त्याची निवडून येण्याची शक्यता अधिक हे समीकरणच झालं आहे. त्यामुळे जवळपास सर्वच पक्षांमध्ये अशाच उमेदवारांना तिकीटं दिली जातात. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांकडे मोठ्या प्रमाणात देणग्यांच्या स्वरुपात पैसा येतो. भाजपा गेल्या पाच वर्षांपासून सत्तेत आहे. मात्र बँक खात्यातील रकमेचा विचार केल्यास मायावतींची बहुजन समाज पार्टी पहिल्या क्रमांकावर आहे. 25 फेब्रुवारीला बसपानं निवडणूक आयोगाकडे आपल्या बँक खात्यातील पैशांचा तपशील दिला. बसपाच्या बँक खात्यात 669 कोटी रुपये आहेत. ही रक्कम भाजपाच्या बँक खात्यातील रकमेच्या तब्बल आठपट आहेत. विशेष म्हणजे 2014 च्या निवडणुकीत बसपाला खातंही उघडता आलं नव्हतं. त्यामुळे लोकसभेत पक्षाचा एकही खासदार नाही. मात्र तरीही बसपाच्या बँक खात्यात मोठी 'माया' आहे. देशात सत्तेवर असलेल्या आणि गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक राज्यांमध्ये सत्तेवर आलेल्या भाजपाच्या बँक खात्यात 81 कोटी 82 लाख 28 हजार रुपये आहेत. 2017-18 या कालावधीत पक्षाला 1027 कोटी रुपये मिळाले. यातील 758 कोटी रुपये पक्षानं खर्च केले. या काळात इतकी रक्कम कोणत्याही पक्षानं खर्च केलेली नाही. सर्वाधिक काळ केंद्रात सत्तेवर असलेल्या काँग्रेसनं निवडणूक आयोगाला बँक खात्याचा तपशील दिलेला नाही. गेल्या मे महिन्यात कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्यावेळी काँग्रेसनं आपल्या बँक खात्यात 196 कोटी रुपये असल्याची माहिती निवडणूक आयोगाला दिली होती. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019mayawatiमायावतीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीcongressकाँग्रेसBJPभाजपा