शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

घराणेशाहीत भाजपाही वरचढ, काँग्रेसला पछाडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 20:48 IST

घराणेशाहीवरून नेहमीच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात.

नवी दिल्ली- घराणेशाहीवरून नेहमीच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. भाजपाकडून घराणेशाहीच्या बाबतीत काँग्रेसला लक्ष्य केलं जातं. परंतु घराणेशाहीमध्ये भाजपाहीकाँग्रेसच्या पुढे असल्याचं आता एका रिपोर्टमधून समोर आलं आहे. इंडियास्पेंडच्या रिपोर्टनुसार, गेल्या 20 वर्षांत भाजपामध्येही घराणेशाही मजबूत झाली आहे. विशेष म्हणजे घराणेशाहीमध्ये भाजपानं काँग्रेसलाही मागे टाकले आहे.13व्या लोकसभा(1999)मध्ये काँग्रेस 36 खासदार हे राजकीय परिवाराशी संबंधित होते. त्यावेळी भाजपा काँग्रेसच्या फार मागे नव्हता. भाजपाचे 31 खासदार हे राजकीय परिवाराशी संबंधित आहेत. 2009मध्येही घराणेशाहीवरून काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यावेळी काँग्रेसचे 12 टक्के, तर भाजपाचे 11 टक्के खासदार हे राजकीय परिवाराशी संबंधित आहेत. 2004मध्ये काँग्रेसची घराणेशाही भाजपाच्या दोन टक्के जास्त होती. 14व्या लोकसभेत भाजपाचे 7 टक्के, तर काँग्रेस 13 टक्के खासदार घराणेशाहीतून आलेले होते. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसनं सर्वाधिक काळ सत्ता उपभोगली आहे.काँग्रेसनं नेहरू-गांधी घराण्याचा राजकीय वारसा पाहता भाऊ आणि पुतण्याच्या घराणेशाहीला जास्त प्रोत्साहन दिल्याचाही त्यांच्यावर आरोप होतोय. इंडियास्पेंडनं या प्रकरणात अमेरिकेतील हॉवर्ड आणि जर्मनीतल्या मॅनहायम युनिव्हर्सिटीच्या संशोधकांचा हवाला दिला आहे. हॉवर्ड युनिव्हर्सिटीत पीएचडी करणारे सिद्धार्थ जॉर्ज म्हणाले, काँग्रेसच्या तुलनेत भाजपामध्ये घराणेशाही दिवसेंदिवस वेगानं वाढत आहे. सिद्धार्थ सांगतात, सुरुवातीच्या काळात भाजपा काँग्रेसपेक्षा छोटा पक्ष असला तरी आता सर्वात मोठा पक्ष झाला आहे. घराणेशाहीच्या आधारावर आई-वडील, बहीण-भाऊ, मुलं-मुली सहभागी आहेत. विशेष म्हणजे या रिपोर्टमध्ये फक्त आई-वडील आणि मुला-मुलींचाच समावेश करण्यात आला आहे.   

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक