शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

स्वत: चोरी करायची अन् दुसऱ्याला चोर म्हणायचं ही काँग्रेसची सवय; भाजपाचा प्रतिहल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 17:37 IST

उर्मिला मांतोडकर यांच्या प्रचारावेळी झालेल्या गोंधळावरुन भाजपा-काँग्रेसमध्ये जुंपली

मुंबई: आपण करायचं आणि आरोप दुसऱ्यावर करायचा ही काँग्रेसची जुनी सवय असल्याची टीका भाजपा खासदार गोपाळ शेट्टींनी केली. आज सकाळी बोरिवली रेल्वे स्थानकाबाहेर काँग्रेसच्या प्रचारावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी 'मोदी-मोदी' अशी घोषणाबाजी करत हुल्लडबाजी केली. यावरुन काँग्रेस उमेदवार उर्मिला मांतोडकर यांनी भाजपावर सडकून टीका केली. या टीकेला भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. चोरी स्वत: करायची आणि दुसऱ्याला चोर म्हणायचं ही काँग्रेसची सवय असल्याचं भाजपाचे विद्यमान खासदार आणि उमेदवार शेट्टींनी म्हटलं.बोरिवली स्थानकाजवळ उर्मिला मांतोडकर त्यांच्या कार्यकर्त्यांसह प्रचार करत असताना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करत मोदी-मोदी अशी घोषणाबाजी केली. या घटनेचा गोपाळ शेट्टींनी तीव्र शब्दांत निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. 'जसा काँग्रेसला त्यांचा प्रचार करण्याचा अधिकार आहे, जसा भाजपाला त्यांचा प्रचार करण्याचा अधिकार आहे. तसंच जनतेलादेखील आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यासाठी त्यांच्यावर हल्ला करणं चुकीचं आहे,' अशा शब्दांमध्ये शेट्टींनी काँग्रेसवर शरसंधान साधलं.हिंमत असेल, तर केलेल्या कामांच्या बळावर निवडणूक लढवा. छुपे आणि चोर हल्ले करून निवडणूक लढू नका, असं आवाहन त्यांनी केलं. आपली अनामत रक्कमही वाचणार नाही, हे काँग्रेसच्या लक्षात आलं आहे. म्हणून ते अशा प्रकारची कृत्यं करून स्वत:साठी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण लोक समजूतदार आहेत. त्यांना कोण खरं कोण खोटं ते कळतं, असं शेट्टींनी म्हटलं. आज सकाळी उर्मिला मातोंडकर यांना भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या हुल्लडबाजीचा सामना करावा लागला. यानंतर मातोंडकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल करत पोलीस संरक्षणाचीही मागणी केली. या हुल्लडबाजीमध्ये एक महिला प्रवासी पडल्यानं जखमी झाली. तर हुल्लडबाज कार्यकर्त्यांना काँग्रेसनं चोप दिला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019mumbai-north-pcमुंबई उत्तरUrmila Matondkarउर्मिला मातोंडकरGopal Shettyगोपाळ शेट्टीBJPभाजपाcongressकाँग्रेस