शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

सपा-बसपाला मतदान म्हणजे पाकिस्तानला मतदान- वरुण गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 9:36 AM

भाजपाचे उमेदवार वरुण गांधी वादात

पिलीभित: भाजपाचे उमेदवार वरुण गांधी पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टीला मतदान म्हणजे पाकिस्तानला मतदान, असं वादग्रस्त विधान वरुण गांधींनी प्रचारादरम्यान केलं. महागठबंधन पाकिस्तानचं प्रतिनिधीत्व करतं. त्यामुळे पाकिस्तानऐवजी भारतमातेसाठी मतदान करा, असं आवाहन गांधींनी केलं. ते पिलीभितमध्ये बोलत होते.  तुम्ही भारतासोबत आहात की पाकिस्तानसोबत, असा सवाल वरुण गांधींनी पिलीभीतमध्ये जनसभेला संबोधित करताना विचारला. तुम्ही महागठबंधनला मतदान करणार असाल, तर ती सर्व मंडळी पाकिस्तानची आहेत. यात काही चुकीचं आहे का, असा प्रश्न त्यांनी पुढे उपस्थित केला. यावेळी त्यांनी समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंग यांच्यावर सडकून टीका केली. 'बाबरी मशीद पाडण्यात आली, त्यावेळी मुलायम सिंग यांनी राम भक्तांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. त्यात 500 जणांनी प्राण गमावला. मुलायम यांचे हात रक्तानं माखलेले आहेत आणि आम्ही ते विसरू शकणार नाही,' अशा शब्दांत वरुण गांधींनी मुलायम सिंग यांच्यावर तोंडसुख घेतलं. याआधी वरुण गांधींनी एका प्रचारसभेला संबोधित करताना वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावेळी त्यांनी बसपा उमेदवारावर पातळी सोडून टीका केली होती. 'लोकांनी त्यांच्या पापांची भीती बाळगावी. कोणा मोनू-टोनूची भीती बाळगू नये. मी संजय गांधींचा मुलगा आहे. अशा माणसांना मी माझ्या बुटाची लेस सोडायला ठेवतो. मी इथे तुमच्यासमोर उभा आहे आणि माझ्या उपस्थितीत कोणीही तुम्हाला काहीही बोलण्याची हिंमत दाखवू शकत नाही,' असं वादग्रस्त विधान गांधींनी केलं होतं. त्याआधी वरुण यांच्या आई आणि केंद्रीय मंत्री मेनका गांधींनी प्रचारादरम्यान केलेल्या वक्तव्यानं वादात सापडल्या. 'तुम्ही मला मतदान करा. अन्यथा मी निवडून आल्यावर तुम्ही काम घेऊन याल, तेव्हा मी त्याला प्रतिसाद देणार नाही,' अशी धमकीच त्यांनी दिली होती.   

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019pilibhit-pcपीलीभीतVarun Gandhiवरूण गांधीBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी