शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वाराणसीची लढाई सर्वोच्च न्यायालयात; प्रशांत भूषण मांडणार तेजबहादूर यांची बाजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 12:53 IST

पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक लढवण्यासाठी तेजबहादूर यांचे प्रयत्न

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातवाराणसी लोकसभा मतदारसंघातून दंड थोपटणाऱ्या निवृत्त जवान तेजबहादूर यादव यांची उमेदवारी काही दिवसांपूर्वीच रद्द करण्यात आली. त्यानंतर आता या प्रकरणी यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. प्रख्यात वकील प्रशांत भूषण यादव त्यांच्या बाजूनं युक्तिवाद करणार आहेत. यादव यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जात माहिती लपवल्याचा आक्षेप घेत निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद केला. यादव यांनी समाजवादी पार्टीकडून उमेदवारी अर्ज भरला होता. तेजबहादूर यादव यांनी सीमा सुरक्षा दलात असताना जवानांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं. सीमा सुरक्षा दलानं तेजबहादूर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. बीएसएफनं केलेल्या कारवाईची माहिती न दिल्यानंच यादव यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला. भ्रष्टाचार किंवा निष्ठेवर शंका उपस्थित करुन बीएसएफमधून निलंबन न झाल्याची कागदपत्रं जमा न केल्यानं निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद केला. बीएसएफमधील निलंबनाचं कारण लपवल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी यादव यांचा अर्ज स्वीकारला नाही. या निर्णयाबद्दल यादव यांनी नाराजी व्यक्त केली. निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय भेदभाव करणारा असल्याचा आरोप त्यांनी केला. तेजबहादूर यादव यांनी आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसीतून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर समाजवादी पार्टीनं त्यांना तिकीट दिलं. यासाठी समाजवादी पार्टीनं शालिनी यादव यांची उमेदवारी मागे घेतली. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019varanasi-pcवाराणसीNarendra Modiनरेंद्र मोदीBSFसीमा सुरक्षा दलSamajwadi Partyसमाजवादी पार्टी