शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

रॉबर्ट वाड्रांना तिरंगा कळेना! आधी पॅराग्वेचा झेंडा ट्विट; फजिती होताच लगेच डिलीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 20:14 IST

झेंडा चुकल्यानं रॉबर्ट वाड्रा ट्विटरवर ट्रोल

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातलं मतदान आज पार पडलं. दिल्लीसह देशातल्या बड्या राजकीय नेत्यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. दिल्लीत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी आज मतदान केलं. प्रियंका यांच्यासोबत त्यांचे पती रॉबर्ट वाड्रांदेखील मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी शाई लावलेल्या बोटासह सेल्फी ट्विट केला. मात्र त्यांनी भारताऐवजी पॅराग्वेचा झेंडा वापरला. त्यामुळे ते ट्विटरवर ट्रोल झाले. 

'आपला अधिकार, आपलं सामर्थ्य', असं ट्विट रॉबर्ट वाड्रांनी केलं. 'तुम्ही सर्वांनी मतदान करण्यासाठी बाहेर पडायला हवं. आपल्या प्रियजनांसाठी एक चांगलं भविष्य घडवणाऱ्यासाठी आपण अशांची मदत करायला हवी, जे आपल्या देशाला धर्मनिरपेक्ष आणि सुरक्षित ठेवतील,' असंदेखील त्यांनी पुढे या ट्विटमध्ये म्हटलं. मात्र या ट्विटमध्ये त्यांनी पॅराग्वेचा झेंडा वापरल्यानं ते ट्रोलर्सच्या रडारवर आले. अनेकांनी वाड्रांचा खरपूस समाचार केला. यानंतर त्यांनी ट्विट डिलीट केलं आणि पुन्हा नवं ट्विट केलं. त्याआधी रॉबर्ट वाड्रांनी प्रियंका गांधीसोबत मतदान केलं. त्यावेळी प्रियंकांना आम आदमी पार्टीसोबतच्या न झालेल्या आघाडीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आपसोबतच्या आघाडीनं काँग्रेसला फायदा झाला नसता, असं प्रियंका म्हणाल्या. मला हिंसा मान्य नाही. जनता सत्ताधाऱ्यांना मतदानातून उत्तर देईल. काँग्रेसला यंदा अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकrobert vadraरॉबर्ट वाड्राcongressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीSonia Gandhiसोनिया गांधीTwitterट्विटर