प्रतिमा हीच मोदींची ताकद; ती मलिन करणं हेच ध्येय- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 09:43 AM2019-05-03T09:43:22+5:302019-05-03T09:45:29+5:30

राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका

lok sabha election 2019 rahul gandhi says pm narendra modi power is his image and i will spoil this image | प्रतिमा हीच मोदींची ताकद; ती मलिन करणं हेच ध्येय- राहुल गांधी

प्रतिमा हीच मोदींची ताकद; ती मलिन करणं हेच ध्येय- राहुल गांधी

googlenewsNext

नवी दिल्ली: प्रतिमा हीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ताकद आहे. त्यामुळे ही प्रतिमा मलिन करणं हेच माझं ध्येय असल्याचं विधान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केलं. मोदींची प्रतिमा डागाळण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचंदेखील ते म्हणाले. 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत राहुल यांनी हे विधान केलं. यावेळी त्यांनी राफेल डीलचा संदर्भ दिला. पंतप्रधान मोदी आणि भाजपा यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव होईल आणि काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली यूपीएचं सरकार येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काही दिवसांपूर्वीच राहुल गांधींनी चौकीदार चोर है प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दिलगिरी व्यक्त केली होती. राफेल विमान खरेदी प्रकरणावरुन सर्वोच्च न्यायालयानं मोदी सरकारला धक्का दिल्यावर राहुल यांनी या प्रकरणावर भाष्य केलं. आता सर्वोच्च न्यायालयानंदेखील चौकीदार चोर है म्हटल्याचं विधान राहुल यांनी केलं होतं. त्यावरुन भाजपानं न्यायालयाचा अवमान झाल्याचा मुद्दा उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानंतर राहुल यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. 

राफेल विमान खरेदीची चौकशी व्हायली हवी, असं राहुल मुलाखतीत म्हणाले. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना तीन सर्जिकल स्ट्राइक करण्यात आले होते, असा दावादेखील राहुल यांनी केला.  'आम्ही ही गोष्ट कधीच जाहीर केली नव्हती. कारण आम्हाला लष्कराच्या कामगिरीचं राजकारण करायचं नव्हतं. आम्हाला जवानांचा वापर करायचा नव्हता. ते (मोदी) जवानांचा राजकीय फायद्यासाठी वापर करत आहेत. आम्ही जवानांना सलाम करतो. त्यांचा आदर करतो. राजकीय लाभासाठी सैन्याचा वापर करुन आम्ही त्यांचा अपमान करत नाही,' असं राहुल गांधींनी म्हटलं. 

Web Title: lok sabha election 2019 rahul gandhi says pm narendra modi power is his image and i will spoil this image

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.