शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

सुशीलकुमार शिंदे दलितांमधलं बुजगावणं; प्रकाश आंबेडकरांची जळजळीत टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 11:23 IST

सुशील कुमार शिंदेंच्या टीकेला प्रकाश आंबेडकरांचं प्रत्युत्तर

सोलापूर: सुशील कुमार शिंदेंनी सोलापूरमधील दलित समाजासाठी काय केलं, असा सवाल भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला. घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांचा नातूच घटनेचा खून करण्यास निघाला आहे, अशी टीका शिंदे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला आंबेडकरांनी प्रत्युत्तर दिलं. सोलापूर लोकसभा मतदारसंघात उतरत प्रकाश आंबेडकरांनीसुशीलकुमार शिंदेंना आव्हान दिलं आहे. 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या कष्टानं राज्यघटना तयार केली. त्यांचेच नातू जातीयवादी पक्षाशी युती करून त्या राज्यघटनेचा खून करण्यास निघाले आहेत,' अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काल केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेसनेच घटना बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. 'राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते यांनी संसदीय लोकशाहीऐवजी अध्यक्षीय निवडणुकीचा पुरस्कार केला होता. इंदिरा गांधींना विचारुन हे विधान केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मग घटना बदलण्याचा प्रयत्न कोणी केला?' असा प्रश्न आंबेडकरांनी उपस्थित केला. सुशीलकुमार शिंदेंची स्मरणशक्ती फार कमी असल्याचा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला. 'शिंदेंच्या डोक्यातील चिपची मेमरी फार कमी जीबीची आहे. मात्र माझ्या डोक्यातील मेमरी चिप जास्त जीबीची आहे. त्यामुळे सर्व गोष्टी माझ्या व्यवस्थित लक्षात राहतात,' असं आंबेडकर म्हणाले. ढसाळे, ढाले आणि ओवैसींची भाषा एकच असल्याचं त्यांनी म्हटलं. काल शिंदेंनी आंबेडकरांवर जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप केला होता. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वधर्मसमभावासाठी लोकशाही, संविधान आणलं. मात्र, त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर जातीय तेढ निर्माण करणाऱ्या एमआयएमशी मैत्री करून राज्यघटनेला गाडून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत,' अशी टीका शिंदेंनी केली होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेcongressकाँग्रेसDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर