शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019: पवारांची माघार, आंबेडकरांच्या घोषणेने आघाडीसमोर अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 07:06 IST

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला तीन मोठे धक्के

मुंबई : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माढा मतदारसंघाच्या मैदानातून निवडणुकीपूर्वीच घेतलेली माघार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय यांनी भाजपात जाण्याचा घेतलेला निर्णय आणि वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात लढण्याचा घेतलेला निर्णय यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला तीन मोठे धक्के बसले आहेत.काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करण्याबाबत युतीपेक्षा आघाडी घेतली होती. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी अनेक बैठकी घेत आघाडीला आकार देण्याचा प्रयत्न केला. त्या मानाने युती कुठेही दृष्टिपथात नव्हती. अचानक युतीचे ठरले. जागावाटपाचा फॉर्म्यूलाही निश्चित झाला. काँग्रेस-राष्ट्रवादीचा घोळ अजूनही सुरुच आहे. त्यातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ.सुजय यांनी भाजपात जाण्याचा निर्णय जाहीर केल्याने आघाडीला पहिला मोठा धक्का रविवारी बसला.वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरातून लढण्याचा निर्णय सोमवारी जाहीर करून दुसरा धक्का दिला. सोलापुरात काँग्रेसचे दिग्गज नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे लढणार आहेत. आंबेडकर यांच्या उमदेवारीने शिंदे यांची डोकेदुखी वाढणार असे मानले जाते. आंबेडकरांच्या निर्णयापाठोपाठ दुपारी मोठी बातमी धडकली ती शरद पवार माढामधून लढणार नसल्याची. त्यामुळे भाजपाच्या गोटात उत्साह संचारला. पवार यांच्या विरुद्ध भाजपाचे संभाव्य उमेदवार म्हणून ज्यांचे नाव घेतले जात होते ते सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणाले की, एका पक्षाच्या राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाने उमेदवारी मागे घेणे हा भाजपाचा देशातील पहिला विजय आहे. पवार यांना पराभव दिसत असल्याने त्यांनी माघार घेतली.भाजपाची निदर्शनेविद्यमान खासदार दिलीप गांधी यांची उमेदवारी संकटात सापडली आहे. ते दिल्लीत तर कार्यकर्ते मुंबईत पक्षश्रेष्ठींना साकडे घालत आहेत़ गांधी यांच्या कार्यकर्त्यांनी विखे यांच्या उमेदवारीस मुंबईत थेट मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शने करून विरोध केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Sharad Pawarशरद पवारPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस