शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

ना अडवाणी, ना अटल; संकल्पपत्रात भाजपाला ज्येष्ठांचा विसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 15:49 IST

5 वर्षांमध्ये बदलला भाजपाच्या जाहीरनाम्याचा चेहरामोहरा

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं आज संकल्पपत्र जाहीर केलं. भाजपा मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, संकल्पपत्र समितीचे प्रमुख राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भाजपानं व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध केलं. यावेळी भाजपाचं व्यासपीठ 2014 च्या तुलनेत पूर्णपणे बदललं होतं. यावेळी मंचावर वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी अनुपस्थित होते. 2014 आणि 2019 मधील भाजपाच्या संकल्पपत्रांची तुलना केल्यास बरेच बदल जाणवतात.संकल्पपत्र प्रसिद्ध करताना पंतप्रधान मोदी, अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली, संघटनमंत्री रामलाल आणि केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत उपस्थित होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरीदेखील या कार्यक्रमात सहभागी होणार होते. मात्र ते नागपुरातील प्रचारात व्यस्त असल्यानं उपस्थित राहू शकले नाहीत. 

2014 च्या तुलनेत किती बदललं व्यासपीठ?पाच वर्षांपूर्वी जाहीरनामा प्रसिद्ध करताना लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, रविशंकर प्रसाद, जेपी नड्डा उपस्थित होते. मात्र हे नेते यंदा हजर नव्हते. 
व्यासपीठासोबतच संकल्पपत्राच्या मुखपृष्ठातही बदलयंदाच्या भाजपाच्या संकल्पपत्रावर नजर टाकल्यास सबकुछ मोदी असं चित्र आहे. संकल्पपत्राच्या मुखपृष्ठावर केवळ मोदींचा फोटो आहे. भाजपानं फिर एक बार मोदी सरकार अशी घोषणा दिली आहे. त्यामुळे पक्ष यंदाही मोदींच्या नावे मतं मागणार हे स्पष्ट आहे. या संकल्पपत्राच्या शेवटच्या पानावर शामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय आणि अटल बिहारी वाजपेयींचा फोटो आहे. 
गेल्या निवडणुकीतलं मुखपृष्ठ कसं होतं?2014 मधील भाजपाच्या जाहीरनाम्यावर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, राजनाथ सिंह (तत्कालीन पक्षाध्यक्ष) यांचे फोटो होते. यानंतर नरेंद्र मोदी (पंतप्रधान पदाचे उमेदवार), अरुण जेटली, सुषमा स्वराज, शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे, मुरली मनोहर जोशी, रमण सिंह, मनोहर पर्रीकर यांचे फोटो होते. भाजपानं तेव्हाच्या जाहीरनाम्यात तत्कालीन मुख्यमंत्र्यांना स्थान दिलं होतं. आता वाजपेयी आणि पर्रीकर या जगात नाहीत. शिवराज सिंह, वसुंधरा राजे आणि रमण सिंह हे तीन नेते आता मुख्यमंत्री नाहीत.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीAmit Shahअमित शहाRajnath Singhराजनाथ सिंहAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी