शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

'बेरोजगार' कन्हैय्या कुमारजवळ ना जमीन, ना स्वतःच घर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 6:10 PM

लोकसभा निवडणूक 2019मध्ये बेगुसराय लोकसभेच्या जागेवरून सीपीआय उमेदवार कन्हैय्या कुमार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

नवी दिल्ली- लोकसभा निवडणूक 2019मध्ये बेगुसराय लोकसभेच्या जागेवरून सीपीआय उमेदवार कन्हैय्या कुमार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यावेळी कन्हैय्या कुमार यांनी प्रतिज्ञापत्रही सादर केलं आहे. प्रतिज्ञापत्रात त्यांनी बेरोजगार आणि स्वतंत्र लेखक असल्याचं सांगितलं आहे. कन्हैय्या कुमार यांच्याकडे स्वतःची जमीन नाही, तसेच स्वतःच घरही नाही. सीपीआयचे उमेदवार कन्हैय्या कुमार यांनी प्रतिज्ञापत्रात एका खात्यात 50 हजार रुपये, तर दुसऱ्या खात्यात 1,63,648 रुपये असल्याचं दाखवलं आहे.तसेच म्युच्युअल फंडात 170150 रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. 2017-18मध्ये कन्हैय्या कुमार यांची संपत्ती 6 लाख 30 हजार 360 रुपये होती. तर तीच 2018-19मध्ये त्याची एकूण संपत्ती 2 लाख 28 हजार 290 रुपये असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलेलं आहे. कन्हैय्या कुमारनं पुस्तक विक्री आणि व्याख्यानांद्वारे पैसे कमावले आहेत. कन्हैय्या कुमार यांच्याविरोधात पाच गुन्हे दाखल आहेत. त्यात धार्मिक तेढ निर्माण करणे, सरकारी कामात हस्तक्षेप करणे, अनधिकृत सभा घेणे आणि कलम 124 एचा भंग करून घोषणाबाजी करण्यासारखे त्यांच्यावर आरोप आहेत.उमेदवारी अर्ज भरण्याआधी कन्हैय्या कुमारनं रोड शोही केला आहे. या रोड शोला अभिनेत्री स्वरा भास्कर, मानवाधिकार कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, गुजरातचे आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी, जेएनयूच्या माजी विद्यार्थी नेत्या शेहला राशिद आदी उपस्थित होते. याप्रसंगी 'लेके रहेंगे आझादी' अशा घोषणाही देण्यात आल्या. कन्हैया कुमार भाजपचे उमदेवार आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. 

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमार